Heat Wave : उत्तर भारत होरपळणार! उष्णतेची लाट येण्याची शक्यता

उष्णतेमुळे यमुना नदीतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होऊ लागले असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Heat Wave
Heat waveesakal
Updated on

नवी दिल्ली - उत्तर भारत उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळून निघण्याची शक्यता वर्तविली जात असून हवामान खात्याने राजस्थान, पंजाब, हरियाना, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी रेडअलर्ट जारी केला आहे. या भागातील तापमान बुधवारी ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णतेमुळे यमुना नदीतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होऊ लागले असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीतील विजेची मागणी ८ हजार मेगावॉटवर पोचली असून प्रत्येक घरामध्ये एअर कंडिशनर, कुलर आणि रिफ्रेजरेटरचा वापर वाढल्याने विजेच्या मागणीमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.

दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात आणि मध्यप्रदेशातील किमान २४ ठिकाणांवर तापमानाने ४५ अंशांची मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. राजस्थानच्या बारमेरमध्ये ४८ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चुरू (४७.४ अंश सेल्सिअस), फालोदी (४७.८ अं.से) आणि जैसलमेर (४७.२ अं.से) यांचा क्रमांक लागतो.

मध्यप्रदेशातील रतलाम येथील पारा ४५ अंशांवर पोचला असून महाराष्ट्रातील अकोला (४४.८), हरियानातील सिरसा (४७.७), पंजाबमधील भटिंडा (४६.६), गुजरातचे कांडला (४६.१) आणि उत्तरप्रदेशातील झाशी (४५) येथेही उष्णता वाढली आहे. उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने लहान मुले आणि वृद्धांना जपणे खूप गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

उष्ण वाऱ्यांचा जोर वाढणार

उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना, दिल्ली आणि राजस्थानात पुढील चार दिवसांमध्ये उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. देशातील १५० जलप्रकल्पांमधील पाण्याच्या साठ्याने मागील आठवड्यातच मागील पाच वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. यामुळे अनेक भागांतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या खालावली असून त्याचा विपरीत परिणाम जलविद्युत निर्मितीवर होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.