Sakal Survey 2024 : उत्तर महाराष्ट्रात मविआ, महायुतीची कसोटी

Sakal Election survey 2024 : नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने खेचून घेत आपला करिष्मा दाखविला आहे.
North Maharashtra sakal election survey 2024 who will get vote maha vikas aghadi mahayuti
North Maharashtra sakal election survey 2024 who will get vote maha vikas aghadi mahayutiSakal
Updated on

- डॉ. राहुल रनाळकर

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात यंदा भाजपची मोठी पिछेहाट झाली, २०१९ मधील पाचपैकी तीन जागा गमवाव्या लागल्या असून महायुतीला जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा कायम राखता आल्या. नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने खेचून घेत आपला करिष्मा दाखविला आहे.

जनमानसात सत्ताधारी पक्षांच्या एकूणच वागणुकीचा हिशेब जनतेने चुकता केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार मातब्बर नव्हते, त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव नव्हता, तरीही त्यांनी मोठ्या फरकाने सत्ताधाऱ्यांवर विशेषतः भाजपवर मात केल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

अर्थात महाविकास आघाडीला दर्शवलेल्या पसंतीपेक्षा भाजपची वाढलेली दादागिरी, महागाई, शेतमालाच्या भावामुळे शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपटीमुळे मतदार चिडलेला होता. नाराजीची ही धार आजही तितकीच कायम असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असला तरी तो उत्तर महाराष्ट्रात तेवढा तीव्र परिणाम करणारा मात्र दिसून आला नाही. 

उत्तर महाराष्ट्र तसा सुरवातीपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे, पण या किल्ल्याला प्रथम सुरूंग लागला तो २०१४ च्या लोकसभा निवडणुकीने. ही निवडणूक भाजपने प्रथमच मोदी या चेहऱ्याभोवती आक्रमकपणे लढविली. कॉंग्रेस मात्र या निवडणुकीला सामोरे जाताना अनेक संकटांचा सामना करत होती.

शिवाय कॉंग्रेसचे नेतृत्व दिशाहीन झाल्यासारखे होते. त्यामुळे २०१४ मध्ये भाजप आणि एकत्रित शिवसेना अशा लढल्या गेलेल्या या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील पाचही जागा जिंकून भाजपने देदीप्यमान यश मिळविले. नंदुरबार आणि धुळ्याची जागा कॉंग्रेसला गमवावी लागली. नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने उत्तर महाराष्ट्रातील सहाही जागा जिंकत झेंडा रोवला.

अर्थात यामागे जनतेला मोदी यांनी दाखविलेले विकासाचे गारूड कारणीभूत होते. देशहितासाठी जनता मोदींच्या पाठीशी राहीली होती, हेही तेवढेच खरे. पण २०१९ नंतर मोदी सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना जनतेत वाढत गेली अन् त्याच्या जोडीला शेतीमालाच्या भावाचा मुद्दा सातत्याने डोके वर काढू लागला,

तो इतका टोकाला गेला की जनतेच्या मूळ प्रश्नांना केंद्र सरकार बगल देत गेले, अन् नाराजीच्या भावनेचे सरकारविरोधी वातावरणात परिवर्तन कधी झाले हेही सरकारला कळले नाही. परिणामी जनतेने सहापैकी केवळ दोनच जागांवर २०२४ मध्ये भाजपला आणून ठेवले. सर्व

विरोधक प्रथमच एका झेंड्याखाली आले हेही भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणता येईल. विरोधकांनी भाजपकडे मागितलेल्या शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे थेटपणे देण्यास सरकार धजावले नाही, यामागे जनतेला सरकार खिजगणतितही धरत नाही ही भावना प्रबळ झाली होती.

एकूण लोकसभेच्या निवडणुकीतील जनतेच्या मनातील खदखद अजूनही शांत झालेली नाही हे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. किंबहुना हाच कल निवडणुका घोषित होताच पुन्हा नव्याने मजबूत होऊ शकतो, हे जनतेच्या मनात आहे हे दिसत आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास विधानसभेच्या ३४ जागांपैकी किमान २२ जागांवर आजतरी महाविकास आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे दिसत आहे.

  • भाजप - 28.89%

  • काँग्रेस -17.05%

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) -16.99%

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) -14.48%

  • शिवसेना -7.49%

  • राष्ट्रवादी काँग्रेस - 5.51%

  • इतर -4.71%

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना -1.24%

  • वंचित बहुजन आघाडी- 1.07%

  • AIMIM- 0.94%

  • अपक्ष -0.80%

  • प्रहार- 0.20%

  • आम आदमी पक्ष -0.19%

  • बहुजन विकास आघाडी- 0.14%

  • शेकाप -0.12%

  • स्वाभिमानी शेतकरी पक्ष -0.10%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.