नवी दिल्ली : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध थांबायचं नाव घेत नाहीए. काल दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना टार्गेट करत दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केलं असून आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नसल्याचं म्हटलं आहे. (Not scared of jail Kejriwal after LG recommends CBI probe into excise policy)
केजरीवाल म्हणाले, “मी सिसोदिया यांना मी 22 वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्याइतका प्रामाणिक किंवा देशभक्त मी कधीही पाहिला नाही” नायब राज्यपालांवर खोटे आरोप केल्याचा आरोप करताना केजरीवाल पुढे म्हणाले, “आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सत्येंद्र जैन यांना तुम्ही अटक केली आणि आता दिल्लीतील लाखो मुलांचे करिअर घडवणारे आणि आयुष्य घडवणाऱ्या सिसोदियांना तुरुंगात टाकायचं आहे.
आपल्या राजकीय विरोधकांना 'सावरकरांची मुले' म्हणत केजरीवाल म्हणाले, “आम्ही भगतसिंगांची मुले आहोत, ज्यांनी इंग्रजांसमोर आपले डोके झुकवण्यास नकार दिला आणि त्यांना फाशी देण्यात आली आम्ही तुरुंगाला घाबरत नाही"
नायब राज्यपाल सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस मुख्य सचिवांना केली होती. नुकत्याच दिलेल्या अहवालानंतर दिल्ली उत्पादन शुल्क कायदा 2009 चे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिसोदिया दारू परवानाधारकांना अवाजवी लाभ देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंजाब निवडणुकीदरम्यान 'आप'ने हा पैसा वापरला असावा, असा आरोपही करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.