गर्भवतींना 'अन फीट' म्हणणाऱ्या SBI ला महिला आयोगाची नोटीस

SBI ने घेतलेल्या या निर्णयानंतर महिला आयोगने कठोर भूमिका घेतली आहे.
SBI
SBITeam eSakal
Updated on

तीन महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या गर्भवती महिलांना (Pregnant Women) सेवेत सामील होण्यापासून रोखणारे नियम तयार करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women) नोटीस बजावली आहे. स्टेट बँकेने या महिलांना 'टेम्पररी अनफिट' म्हटलं आहे. आयोगाने एसबीआयला ही मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्यामागील प्रक्रिया आणि त्यांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

SBI
‘मंदिर जमीन हडप करू शकत नाही’ मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वात मोठी सार्वजनिक बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने काही दिवसांपुर्वीच गर्भवती महिला उमेदवारांसाठी भरती नियम बदलले आहेत. बँकेच्या नवीन नियमांनुसार, तीन महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या महिला उमेदवारांना नवीन भरतीसाठी 'टेम्पररी अनफीट' मानलं जाईल. प्रसूतीनंतर चार महिन्यांत त्या महिला बँकेत रुजू होऊ शकतात. नवीन भरती किंवा पदोन्नतीसाठी एसबीआयने आपल्या वैद्यकीय फिटनेस मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे की, तीन महिन्यांपेक्षा कमी गर्भवती असलेल्या महिला उमेदवारांनाच 'फिट' मानलं जाईल.

SBI
राजकीय पक्षांच्या मालमत्तेत एकट्या BJP चा 69 % वाटा; काँग्रेस पडली मागे
SBI
देशातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात... पण मृत्यू वाढले!

महिला आयोगाच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर, त्यांनी बँकेचा हि निर्णय भेदभाव करणारा आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना मिळणाऱ्या सेवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महिला अयोगाने SBI ला मंगळवारपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं आहे. नोटीसमध्ये बँकेला मार्गदर्शक तत्त्वं आणि नियमांची प्रत सादर करण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()