नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण बाहेर जाण्यासाठी ओला किंवा उबर सारख्या कंपन्यांची सेवा वापरत असाल. मात्र, काही जणांना टॅक्सी बुक करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, नागरिकांची हीच गैरसोय लक्षात घेता उबर कंपनीने आता व्हॉट्अपच्या माध्यमातून टॅक्सी बुक करता येणार असल्याची घोषणा कंपनीने गुरुवारी केली आहे.
नव्याने देण्यात येणाऱ्या सुविधेमध्ये राईड बुक करण्यासाठी वापरकर्त्यांना Uber अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नसून, ग्राहक आता थेट इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वरून सहजरित्या टॅक्सी बुक करू शकणार आहेत.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, उबरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'या आठवड्यापासून आम्ही एक नवीन सेवा सुरू करत आहोत, ज्यामुळे लोकांना अधिकृत Uber WhatsApp चॅटबॉटद्वारे राइड बुक करण्याचा पर्याय मिळेल.' तसेच, 'राईड्सना यापुढे राइड बुक करण्यासाठी Uber अॅप डाउनलोड करण्याची किंवा वापरण्याची गरज नसून वापरकर्त्याच्या नोंदणीपासून ते राइड्सचे बुकिंग आणि ट्रिपचे बिल मिळवण्यापर्यंत सर्व काही व्हॉट्सअॅपच्या चॅट इंटरफेसद्वारे दिले जाणार आहे.
नवीन वैशिष्ट्य कार्य कसे असेल
व्हॉट्सअॅपद्वारे राइड बुक करण्यासाठी, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना बारकोड स्कॅन करून तो उबेरच्या व्यवसायिक क्रमांकावर मेसेज करावा लागेल किंवा ग्राहकांना थेट लिंकवर क्लिक केल्यानंतरदेखील उबर व्हॉट्सअॅप चॅटवर जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. याशिवाय रायडर्सना व्हॉट्सअॅप चॅटवरच सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत उबेरशी संपर्क कसा साधायचा याचीही माहिती दिली जाणार आहे.
प्रथम लखनऊमध्ये मिळणार सेवा
कंपनीने सांगितले की, ही सेवा पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुरू केली जात आहे. त्यानंतर त्याचा विस्तार इतर शहरांमध्ये केला जाईल. प्रथम ही सेवा इंग्रजीमध्ये सुरू होणार असून ही सेवा इतर भारतीय भाषांमध्येही लॉन्च करण्याची योजना असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.