झोपी गेलेल्या केंद्र सरकारला कामगारप्रश्नी जागे करायचे आहे - सचिन अहिर

आंबेकर स्मृतिदिनी अहिर यांचे उद्गार
sachin ahir
sachin ahirSakal media
Updated on

मुंबई : बंद एनटीसी गिरण्यांच्या (closed NTC Mill) प्रश्नावर देशातील खासदारांना आपण जाणीव करून दिली आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) देखील आपल्याबरोबर आहेत. मात्र झोपी गेलेल्या केंद्र सरकारला (central government) याप्रश्नी जागे करायचे मोठे काम आहे, असे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी येथे सांगितले.

sachin ahir
'आमच्या अहवालावर आधारीत बैलगाडा शर्यतीचा निकाल'

संघाचे संस्थापक स्व. गं. द. आंबेकर यांचा 57 वा स्मृतीदिन सोमवारी महात्मा गांधी सभागृहात झाला. त्यावेळी अहिर बोलत होते, खासदार गजानन कीर्तीकर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर राऊत यांनी अन्य शिवसेना खासदारांसह संसदेत रान उठवले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांचा याप्रश्नी पाठिंबा असल्याचे सांगितले. या प्रश्नावर राज्याचे सर्व खासदार ठामपणे उभे राहिले तर पंतप्रधानांनाही राजी करणे अशक्य ठरणार नाही, असेही अहिर म्हणाले.

बाल्यावस्थेतील कामगार कायदे कामगारांच्या हिताचे ठरावेत, यासाठी आंबेकर यांनी आयुष्यभर संघर्ष आणि लढा उभा केला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत भारतीय कामगारांचे प्रतिनिधित्व करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्यांचा वारसा पुढे नेताना नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे, असे गजानन किर्तीकर म्हणाले. सचिन अहिर यांनी देशातील एनटीसी कामगारांच्या लढ्याचे नेतृत्व करून संघटनेला एक नवा आयाम प्रप्त करून दिला आहे, असेही कीर्तीकर यांनी नमूद केले. नारायण मेघाजी लोखंडे - महाराष्ट्र श्रम संशोधन संस्थेचे सहाय्यक संचालक पी. एम. कडूकरही यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

आंबेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगारांसाठी चंदना प्रमाणे झिजविले आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम संघटना करीत आहे, असे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविकात सांगितले. एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवणाऱ्या कीर्तीकर यांचा खजिनदार निृवत्ती देसाई यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. तर कडूकर यांनी अहिर यांचा सत्कार केला. एनटीसी प्रश्नावर यशस्वी लढा उभारणारे आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी. गावडे यांचेही विशेष आभार मानण्यात आले. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.