Nuh Violence : मी शिवभक्त तरी, हिंदुत्ववाद्यांनी माझं दुकानही सोडलं नाही; दुकान मालकाची प्रतिक्रिया

Nuh Violence
Nuh Violence
Updated on

नवी दिल्ली - हरियाणाच्या विविध भागांमध्ये सोमवारच्या शोभा यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचारात, ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांच्यातील काही हिंदू दुकान मालकांनी दावा केला की त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करणारे हिंदुत्ववादी होते. या हिंसेत सोहना येथे, एका ऑटोमोबाईल दुकानाचे मोठे नुकसान झाले. या दुकानेचे मालक शत्रुघ्न शुक्ला यांच्या घरासमोर असलेली बुलेट बाईक देखील पेटवून देण्यात आली होती.

Nuh Violence
Koyna Dam : मोठा दिलासा! कोयना धरण आलं भरत, धरणात 'इतका' TMC पाणीसाठा तर महाबळेश्वरला 110 मिलिमीटर पाऊस

“मी खोलीतून लपून सर्व पाहिले. यात्रेतील बजरंग दलाच्या लोकांनी येऊन माझी दुचाकी पेटवून दिली. त्यांनी एक स्कूटी आणि एका कारचेही नुकसान केले. मी सर्व काही पाहत होतो, पण मी बाहेर पडू शकलो नाही, कारण शंभर जणांच्या गर्दीसमोर एक माणूस काय करू शकतो? मी असहाय होतो,” असंही शुक्ला यांनी म्हटलं. द क्विंटने याबाबत वृत्त दिलं आहे.

दंगलखोरांनी दुकानाला लक्ष्य का केले असेल, असं विचारलं असता शुक्ला म्हणाले, त्यांना हे मुस्लिमांचे दुकान वाटले असावे.” ते पुढं म्हणाले, “या संपूर्ण गल्लीत फक्त मुस्लिमांची घरे आणि मुस्लिमांची दुकाने आहेत. त्यातले बरेचसे नष्टही झाले. माझे हे एकमेव हिंदूंचे दुकान आहे. त्यामुळे हे सुद्धा मुस्लिमांचे दुकान आहे असे त्यांनी गृहीत धरले असावे.

दरम्यान दंगलखोरांना मला सांगायचे होते की मी हिंदू आहे, पण मी खूप घाबरलो होतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का कोणास ठाऊक, मात्र हे सांगणं देखील धोकादायक होतं, असंही शुक्ला म्हणाले.

Nuh Violence
Weather Update: राज्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात अद्याप प्रतीक्षाच! आज 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

शुक्ला यांच्या दुकानाचे नाव 'शिवा ऑटोमोबाईल' आहे. ते म्हणाले मी शिवभक्त आहे, पण तरीही त्यांनी मलाही सोडले नाही. यावर का बोलणार ही त्यांची मानसिकता आहे. याच जागेवर ते एक दशकापासून दुकान चालवत आहेत. “पण मला कोणत्याही मुस्लिमाकडून कधीही अडचण आली नाही. आम्ही भावासारखे राहतो, असंही शुक्ला म्हणाले.

हिंदूंच्या मालकीच्या ढाब्याची तोडफोड

सोहना येथील ‘शंकर शंभू हॉटेल अँड रेस्टॉरंट’ नावाच्या ढाब्याचीही तोडफोड करण्यात आली असून , त्याचा बोर्ड, किचन आणि फ्रीजचे नुकसान झाले आहे. लोकेश सिंग या मालकाने सांगितले की, तो आणि त्याचे भाऊ वरच्या मजल्यावर लपून बसले होते.

दंगलखोरांनी आत प्रवेश केला, आमच्या खिडक्या तोडल्या, आमचा फ्रीज, आमचा सिलिंडर चोरला, ढाब्याच्या एका भागात आग लावली... आम्ही वरच्या मजल्यावरून सर्व काही पाहत होतो, असंही सिंग यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()