Oath Ceremony Wild Animal: शपथविधीवेळी राष्ट्रपती भवनात दिसलेला 'तो' प्राणी कोण? दिल्ली पोलिसांनी काढलं शोधून

मंत्र्याचा शपथविधी सुरु असताना अचानक मागून बऱ्याच अंतरावरुन एक प्राणी जाताना कॅमेरॅत कैद झाला, तो बिबट्या असल्याची चर्चा काल सुरु होती.
Oath Viral Video
Oath Viral VideoEsakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा काल राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी एका मंत्र्याचा शपथविधी सुरु असताना अचानक मागून बऱ्याच अंतरावरुन एक प्राणी जाताना कॅमेरॅत कैद झाला. हा प्राणी अचानक तिथं कसा आला? तो नेमका कोणता प्राणी होता? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं चर्चेत आले. तो लांबलचक प्राणी बिबट्या असल्याचं अनेकांनी वृत्तही चालवलं. पण आता दिल्ली पोलिसांनी या प्राण्याची ओळख पटवली आहे. (Oath taking ceremony wild animal in rashtrapati bhavan delhi police confirmed identity)

खासदार दुर्गादास यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नियमाप्रमाणं कागदपत्रांवर सह्या केल्या आणि मंचावरुन उठून ते राष्ट्रपतींना अभिवादन करायला गेले असातना त्यांच्या मागून एक प्राणी आडवा जाताना कॅमरॅमध्ये कैद झाला. कॅमेरॅत तो कैद झालेला असला तरी तो खूपच पुसटसा दिसत आहे, त्यामुळं हा प्राणी कोणता हे नेमकं सांगता येत नाहीए. त्यामुळं हा प्राणी बिबट्याचं असल्याचं स्पष्ट होत नव्हतं, पण दिवसभर तशी चर्चा मात्र रंगली होती.

Oath Viral Video
Oath Viral Video: मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यातही पोहोचला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील व्हिडीओ व्हायरल

दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हा प्राणी नेमका कोण होता हे शोधून काढलं असून त्याबाबत नुकतंच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की, काही मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडर्सनं एका प्राण्याचा फोटो दाखवला. जो राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यातील लाईव्ह प्रसारणातला फोटो होता. यामध्ये हा प्राणी वन्यजीव असल्याचा दावा या मीडियानं केला होता.

पण हा दावा खोटा आहे, कारण कॅमेरॅत जो प्राणी कैद झाला आहे ती एक सर्वसाधारणपणे घरात पाळली जाणारी मांजर आहे. त्यामुळं यासंदर्भातील कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका आणि त्याला बळीही पडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.