Narvekar-Shinde Meet: आमदार अपात्रतेवर उद्या निकाल! नार्वेकर अन् CM शिंदेंची झाली भेट; ठाकरेंची थेट सुप्रीम कोर्टात धाव

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणाचा उद्या अंतिम निकाल सुनावला जाणार आहे.
Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result eSakal
Updated on

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणाचा अंतिम निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. पण या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

याविरोधात ठाकरे गटाच्यावतीनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यातून त्यांनी दोघांमध्ये मिलीभगत आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. (Objection on Meeting between Rahul Narvekar and CM Eknath Shinde an application was filed in Supreme Court by Shivsena Thackeray Group)

ठाकरे गटानं अर्जात काय म्हटलंय?

ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनी हे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, अपात्रतेची टांगती तलवार असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी निकाल देणारे अध्यक्ष नार्वेकर यांची निकालापूर्वीच तीन दिवस आधी भेट घेतली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. याद्वारे ते निकालावर प्रभाव टाकू शकतात, असं ठाकरेंनी दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा

न्यायमूर्ती-आरोपींची भेट - ठाकरे

लवाद म्हणून आपले विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत असेल किंवा अनधिकृत असेल दोनदा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलेले आहेत. म्हणजे दोनदा ते आरोपीला भेटले आहेत. आमच्या दृष्टीनं ते आरोपी आहेत.

आम्ही त्यांच्यावर अपात्रतेचा खटला दाखल केला आहे. आमच्याकडून नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा आहे. पण जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर आम्ही यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा ठेवायची. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
Sangli Lok Sabha Election: काँग्रेससने खेळला हुकमी एक्का! लोकसभेची निवडणूक ठरवणार सांगलीची पाटीलकी

शिंदे-नार्वेकर मिलिभगत आहे का?

आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या हे निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. कारण ते न्यायाधिशाच्या भूमिकेत आहेत. न्यायाधीश आणि आरोपीची मिलिभगत आहे का? असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही. यामुळं पुढे देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
Share Market Closing: शेअर बाजारात विक्री; सेन्सेक्स घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वधारले?

लोकशाहीत बहुमताला महत्व

निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमताला महत्व, बहुमत आमच्याकडं आहे. निवडणूक आयोगानं अधिकृत शिवसेना पक्ष आणि चन्ह आम्हाला दिलेलं आहे. मेरिटप्रमाणं निकाल लागणार अशी आम्हाला अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.