Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

Odisha Election Result: ओडिशाच्या 145 जागांवर कल दिसून आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय जनता पार्टी 78 जागांवर आघाडीवर आहे आणि ट्रेंडमध्ये आवश्यक आकडा पार केला आहे.
bjp leading in odisha
bjp leading in odishaesakal
Updated on

ओडिशाच्या 145 जागांवर कल दिसून आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय जनता पार्टी 78 जागांवर आघाडीवर आहे आणि ट्रेंडमध्ये आवश्यक आकडा पार केला आहे. त्याचवेळी बीजेडी 49 जागांवर तर काँग्रेस 14 जागांवर पुढे आहे. आतापर्यंत केवळ 4 जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी 74 जागांची आवश्यकता आहे.

ओडीशामध्ये भाजपने ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. नवीन पटनायक यांच्या २६ वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. ओडिशामध्ये केवळ बीजेडीला ५१ जागांवर आघाडी मिळाली आहे.

ओडिशामध्ये केवळ बीजेडीला ५१ जागांवर आघाडी मिळाली आहे. सर्व प्रमुख एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. ओडिशातील विधानसभा जागांवरही भाजपला फायदा होताना दिसत आहे. एक्झिट पोलचे अंदाज निकालात बदलले असल्याचे दिसून येत आहे.

bjp leading in odisha
Latest Marathi News Update: राज्यासह देशातील महत्वाच्या घडमोडी येथे वाचा एका क्लिकवर

नवीन पटनायक 2024 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीकडून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर कोणत्याही प्रादेशिक चेहऱ्याशिवाय ही निवडणूक लढवली. ओडिशा विधानसभेच्या 147 जागांसाठी आणि लोकसभेच्या 21 जागांसाठी 13 मे ते 1 जून या चार टप्प्यांत मतदान झाले आणि आज निकाल जाहीर होणार आहेत.

bjp leading in odisha
Andhara Pradesh : आंध्र प्रदेशात भाजप-टीडीपी सत्तेच्या आघाडीवर; तर YSR काँग्रेसला...

नवीन पटनायक 2024 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीकडून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर कोणत्याही प्रादेशिक चेहऱ्याशिवाय ही निवडणूक लढवली. ओडिशा विधानसभेच्या 147 जागांसाठी आणि लोकसभेच्या 21 जागांसाठी 13 मे ते 1 जून या चार टप्प्यांत मतदान झाले आणि आज निकाल जाहीर झाला आहे. ओडिशात लोकसभा आणि विधानसभेत भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे.

bjp leading in odisha
Jalgaon Lok Sabha Constituency : जिल्ह्यात भाजप गड राखणार की मविआची मुसंडी? रावेर, जळगावच्या निकालाची उत्सुकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.