भुवनेश्वर : ओडिशात अनेक वर्षांपासूनचं राज्य करणाऱ्या बिजू जनता दलाचे सर्वोसर्वा नवीन पटनायक यांच्या सरकारला पराभूत करुन भाजपनं एकहाती सत्ता मिळवली असून इतिहास घडवला आहे. नुकताच भाजपच्या मोहन चरन माझी यांनी इथं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज इथं संपूर्ण मंत्रीमंडळ आणि खाते वाटप जाहीर झालं आहे. यामध्ये गृह, अर्थ, कृषी आणि पर्यटन ही महत्वाची खाती कोणाच्या वाट्याला आली आहेत. जाणून घ्या संपूर्ण यादी. (Odisha Cabinet Portfolios who holds important portfolios of Home Finance Agriculture and other need to know full list)
ओडिशाच्या सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांसह १६ मंत्र्यांनी पदभार स्विकारला आहे. या सर्व १६ मंत्र्यांकडं विविध खाती सोपवण्यात आली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्याकडं गृह मंत्रालय, सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणि जनसंपर्क, जल संपदा, नियोजना आणि अभिसरण मंत्रालय तसंच जी खाती इतर कोणाकडेही नाहीत ती सर्व मुख्यमंत्र्यांकडं असणार आहेत.
उर्वरित मंत्र्यांची यादी आणि खाते वाटप असे--
1. मोहन चरण माझी (मुख्यमंत्री) - गृह, सामान्य प्रशासन, जाहिरात व सार्वजनिक तक्रार, माहिती आणि जनसंपर्क, जलसंपदा, नियोजन आणि अभिसरण, विशेषत: नियुक्त न केलेले इतर कोणतेही विभाग.
2. कनक वर्धनसिंह देव (उपमुख्यमंत्री) - कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण, ऊर्जा
3. पार्वती परिदा (उपमुख्यमंत्री) - महिला आणि बाल विकास, मिशन शक्ती, पर्यटन
4. सुरेश पुजारी - महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन
5. रबी नारायण नाईक - ग्रामविकास, पंचायती राज आणि पेयजल
6. नित्यानंद गोंड - शाळा आणि जनशिक्षण, एसटी आणि एससी विकास, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कल्याण, सामाजिक सुरक्षा आणि अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण
7. कृष्ण चंद्र पत्र - अन्न पुरवठादार आणि ग्राहक कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान
8. पृथ्वीराज हरिचंदन - कायदा, कार्य, अबकारी
9. मुकेश महालिंग - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, संसदीय कामकाज, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
10. बिभूती भूषण जेना - वाणिज्य आणि वाहतूक, पोलाद आणि खाणी
11. कृष्ण चंद्र महापात्रा - गृहनिर्माण आणि नागरी विकास, सार्वजनिक उपक्रम
12. गणेश राम सिंगखुंटिया - वन, पर्यावरण आणि हवामान बदल, कामगार आणि कर्मचारी राज्य विमा
13. सूर्यवंशी सूरज - उच्च शिक्षण, क्रीडा आणि युवक सेवा, ओडिया भाषा साहित्य आणि संस्कृती
14. प्रदीप बाळ सामंत - सहकार, हातमाग, कापड आणि हस्तकला
15. गोकुळानंद मल्लिक - मत्स्य व्यवसाय आणि प्राणी संसाधन विकास, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उद्योग
16. संपद चंद्र स्वेन - कौशल्य विकास आणि तांत्रिक शिक्षण
दरम्यान, गुरुवारीच ओडिशातील खाते वाटप जाहीर होण्याची अपेक्षा होती. शुक्रवारी कॅबिनेट मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी सांगितलं होतं की, वाटप पूर्ण झालं आहे आणि राज्यपालांच्या घरातून यादी कधीही जाहीर केली जाऊ शकते. मात्र, शुक्रवारी रात्रीही पोर्टफोलिओची यादी जाहीर झाली नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.