Lockdown: मुक्या जनावरांची हाक मुख्यमंत्र्यांच्या कानी; घेतला मोठा निर्णय

stray animals
stray animalsphoto
Updated on

नवी दिल्ली (Odisha) - देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या भयंकर विषाणूला थोपवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये कठोर लॉकडाऊन (COVID19 lockdown) लादण्यात आला आहे. कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असताना भटक्या जनावरांचा (stray animals) कोणी विचार करणं तसं दुरापास्तच. पण, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (CM Naveen Patnaik) यांनी अशा भटक्या जनावरांचाही विचार केला आहे. त्यांनी पाच महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ एनएसीमध्ये कोविड लॉकडाऊनच्या दरम्यान भटक्या जनावरांना अन्न मिळावे, यासाठी मुख्यमंत्री रिलिफ फंड अंतर्गत (सीएमआरएफ) ६० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Odisha CM Naveen Patnaik sanctioned 60 lakhs from CMRF feed stray animals during COVID19 lockdown

stray animals
आसाम, ओडिसा, आंध्रातून गांजाची ‘खेप’

कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक राज्यांमध्ये वाढत आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या प्रवासावर बंधनं आले आहेत. अशात भटक्या जनावरांना अन्न मिळणं जवळपास बंद झालं आहे. त्यामुळे अशा प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली असून अनेकांचा यामुळे मृत्यू होत असल्याचं समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ओडिसा सरकारने स्तुत्य निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या निर्णयाचे अन्य राज्येही अनुकरण करतील, अशी आशा आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशात 4 लाख 03 हजार 738 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर चार हजार 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत विक्रमी तीन लाख 86 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.