Government Decision: अंत्यसंस्कारासाठी आता गायीच्या गोवऱ्यांचा वापर करावा लागणार; सरकार समिती नेमणार
Latest Marathi News: उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार असून त्यात पाच मंत्री आणि पाच सचिवांचा समावेश असेल. शिवाय ही समिती गायीचे शेण आणि मूत्र याच्या अतिरिक्त वापराबाबत संशोधन करेल. गो संरक्षण, दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनाला चालना देण्याचाही उद्देश या समितीचा असणार आहे. पण जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक नरेश दास यांनी सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे.
भुवनेश्वर: पुरी येथील स्वर्गद्वार स्मशानभूमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांऐवजी गायीच्या गोवऱ्यांचा वापर करण्याची योजना ओडिशा सरकार आखत आहे. यासाठी समिती नेमली असून पशु उत्पादनाच्या अन्य वापरांबाबतही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.