Odisha Lok Sabha 2024 : सत्ताधारी ‘बीजेडी’ आणि ‘भाजप’मध्ये चुरस; ओडिशामध्ये काय आहे स्थिती?

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप व ‘बीजेडी’ युती होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती. त्यादृष्टीने चर्चाही झाली होती. पण अखेर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत.
Orissa Lok Sabha 2024
Orissa Lok Sabha 2024eSakal
Updated on

ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाची सत्ता २००० पासून अबाधित आहे. यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप व ‘बीजेडी’ युती होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती. त्यादृष्टीने चर्चाही झाली होती. पण अखेर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे येथे ‘बीजेडी’, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे.

बिजू जनता दल आणि ओडिशा हे समीकरण गेले अनेक वर्षे मतदारांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीत पक्ष सत्तेवर येऊन मुख्यमंत्रिपदी नवीन पटनाईक यांची नियुक्ती होणे, हेही जणू निश्‍चित असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातील इतर राजकीय पक्षांपेक्षा त्यांची तळागाळातील संघटना अधिक मजबूत आहे. आर्थिक गैरव्यवहार, खाण भ्रष्टाचार यासारखे मुद्दे असूनही सत्ताधारी पक्षाविरुद्ध लाट निर्माण करण्यात भाजप आणि काँग्रेस अपयशी ठरले आहेत.

राज्यातील विविध विभागांत पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे सरकारला शक्य झालेले नाही. भ्रष्टाचार वाढला आहे, कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. राज्यातील अनेक मंत्री गंभीर गुन्हे आणि भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. यामुळे राज्यात सत्ताविरोधी लाट आहे. मात्र तरीही विरोधी आघाडीवर शांतता असल्याचे दिसत आहे.

निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढायची याचा निर्णय राजकीय पक्षांकडून अद्याप झालेला नाही. सर्वसामान्य मुद्यांची आखणी करण्यासाठी ‘बीजेडी’ने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. भाजपचा भर ‘मोदी गॅरंटी’वर असून काँग्रेसने अद्याप ना उमेदवार जाहीर केले ना जाहीरनामा. येथे लोकसभेच्या २१ जागा आहे. शेवटच्या चार टप्प्यांत मतदान होणार आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणूकही होणार आहे.

Orissa Lok Sabha 2024
राज्य-मिती : ‘हिंदी पट्ट्यात’ मोदींची जादू कायम; मध्य प्रदेशात काय स्थिती?

मैत्रीपूर्ण निवडणुकीची शक्यता मावळल्याने दोन्ही निवडणुकांमध्ये बिजू जनता दल आणि भाजप यांच्यात टक्कर अपेक्षित आहे. यंदा निवडणुका चुरशीने लढविल्या जातील. युतीबाबत पक्ष कार्यकर्त्यांमधील वाढता रोष लक्षात घेऊन भाजप व ‘बीजेडी’ने एकत्र येण्याचे टाळले. ओडिशात काँग्रेस कमकुवत असली तरी यावेळी चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. भाजप व ‘बीजेडी’तील ‘अंतर्गत संबंधा’विरुद्ध आवाज उठविण्याची संधी काँग्रेसला असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

लक्षवेधी लढती

  • संबळपूर : प्रणव प्रकाश दास (बीजेडी) विरुद्ध केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (भाजप)

  • केंद्रपाडा : अशुंम मोहंती (बीजेडी) विरुद्ध वैजयंत पांडा (भाजप)

  • भुवनेश्‍वर : मन्मथ राऊतरे (बीजेडी) विरुद्घ अपराजित सारंगी (भाजप)

  • पुरी : दिलीप तिर्की (बीजेडी) विरुद्घ जुआल ओरम (भाजप)

Orissa Lok Sabha 2024
राज्य-मिती : उत्तराखंडमध्ये भाजपची हॅट्ट्रिक, की काँग्रेसची सरशी?

२०१९मधील बलाबल

  • एकूण जागा २१

  • बीजेडी १२

  • भाजप ८

  • काँग्रेस १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.