भुवनेश्वर: ओडिशामध्ये मागील पाच वर्षांत वीज कोसळून एक हजार ६२५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी ओडिशाच्या विधानसभेत दिली. भाजपचे खासदार टंकधर त्रिपाठी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुजारी यांनी ही माहिती दिली.
‘‘देशभरातील अन्य राज्यांच्या तुलनेत वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या तुलनेत ओडिशातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. ओडिशात खनिजाचे साठे सर्वाधिक आहेत आणि खनिजे ही विजेची सुवाहक असल्याने येथे वीज कोसळण्याच्या घटना सर्वाधिक घडतात,’’ असा दावा पुजारी यांनी यावेळी केला.