PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; चक्क आगीच्या मदतीने बनवलं खास पोर्ट्रेट! पाहा व्हिडिओ

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे.
PM Modi Birthday
PM Modi BirthdayeSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. ओडिशामधील एका स्मोक आर्टिस्टने देखील अनोख्या पद्धतीने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कटकमध्ये राहणारे स्मोक आर्टिस्ट दीपक बिस्वाल यांनी पंतप्रधान मोदींचं एक अनोखं पोर्ट्रेट बनवलं आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, आणि मागच्या बाजूला कोणार्कच्या सूर्यमंदिरातील चक्र दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, हे पोर्ट्रेट पेन्सिल किंवा पेंटब्रशचा वापर करून नाही, तर चक्क आगीचा वापर करून बनवण्यात आलं आहे.

PM Modi Birthday
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना तुम्हीही देऊ शकता थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा; जाणून घ्या कसं

स्मोक आर्ट बनवताना आगीचा धूर आणि सुई या गोष्टींच्या सहाय्याने कॅनव्हास किंवा कागदावर चित्रं काढली जातात. ओडिशामधील स्मोक आर्टिस्ट दीपक हे अशा प्रकारचे पोर्ट्रेट बनवण्यासाठी ओळखले जातात. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दीपक यांनी या पोर्ट्रेटबद्दल माहिती दिली आहे.

PM Modi Birthday
PM Modi Daily Routine : पंतप्रधान मोदींप्रमाणे अशी करा दिवसाची सुरुवात, 18 तास काम करूनही राहाल अ‍ॅक्टिव्ह

दीपक सांगतात, "पंतप्रधान मोदींच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी हे पोर्ट्रेट तयार केलं आहे. यामध्ये मी पंतप्रधान मोदींसह ओडिशाची संस्कृती दाखवणाऱ्या कोणार्क चक्राचाही समावेश केला आहे. पंतप्रधान मोदींनी G20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं, तेव्हा पाठीमागे पडद्यावर हेच चक्र दाखवलं होतं. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती."

PM Modi Birthday
Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या फुफाट्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.