Odisha Train Accident : राजीनाम्याच्या मागणीवर रेल्वे मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले...

ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Odisha Train Accident
Odisha Train Accident
Updated on

ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ९०० हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर देत ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे म्हटले आहे.(Odisha Train Accident Ashwini Vaishnaw on Opposition demands resignation)

काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

ही राजकारण करण्याची वेळ नाही. बचावकार्यावर आमचं लक्ष आहे. पूर्ण ताकदीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी भेट देत आवश्यक सूचना दिल्या आहे. घटनेची चौकशी करून १५ ते २० दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल.

Odisha Train Accident
Odisha Train Accident : डब्याचे पत्रे चिरून जखमींना बाहेर काढले

रेल्वेच्या ‘कवच’ या यंत्रणेवरूनही विरोधी पक्षाने अश्विनी वैष्णव यांना लक्ष्य केलं. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ही बाब कवच यंत्रणेची नाही. तपास अहवालात सर्व काही समोर येईल. अशा प्रकारच्या अपघातात मानवी संवेदनशीलता खूप महत्वाची आहे. आमचं पहिलं काम बचावकार्याचं आहे. असं अश्विनी वैष्णव म्हणाले.

Odisha Train Accident
Odisha Train Accident : दोषींवर कठोर कारवाई करणार, बालासोरमध्ये जखमींना भेटल्यानंतर मोदींचे आश्वासन

ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात शालीमार – चेन्नई कोरोमंडळ एक्स्प्रेस, बंगळुरु- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन गाड्यांची टक्कर होऊन शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात २८८ लोकांचा मृत्यू तर ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी रेल्वेच्या ‘सुरक्षा कवच’ टक्कर विरोधी यंत्रणेवर प्रश्न निर्माण केला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणात रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.