Balasore Train Accident : बालासोर रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर बहानगा बाजार स्टेशनचे ज्युनियर इंजीनियर अमीर खान फरार झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र रेल्वेने हे वृत्त नाकारले आहे. ही माहिती केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनीही या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, 'बहानगाचा एक कर्मचारी फरार आणि बेपत्ता असल्याच्या बातम्या काही माध्यमांत येत आहेत. हे चुकीचे आहे. संपूर्ण कर्मचारी हजर असून तपास यंत्रणा सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर होत आहेत. (Balasore Train Accident)
बालासोर ट्रेन दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या सीबीआयने नुकतीच ज्युनियर इंजीनियर आमिर खानची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा टीम जेव्हा त्याच्या घरी पोहोचली तेव्हा ते घराला लॉक होते. या घटनेनंतर सीबीआयने जेईचे घर सील केल्याची अफवा पसरली होती.
मात्र, वस्तुस्थिती यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. रेल्वेने म्हटले आहे की तपासाच्या कक्षेत येणारे सर्व रेल्वे कर्मचारी तपास यंत्रणा सीबीआयला पूर्ण सहकार्य करत आहेत. रेल्वेनेच केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
आमची इंटरलॉकिंग सिस्टीम इतकी मजबूत आहे की कोणतीही छेडछाड केल्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही, अशी शंका रेल्वेने व्यक्त केली होती. यानंतर ओडिशातील रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.