नवी दिल्लीः ओडिसातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा बळी गेला. तर ११०० हून अधिक जण जखमी झालेत. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत. मात्र पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
'काही सोशल मीडिया हँडल बालासोर अपघाताबाबत अफवा पसरवत आहेत. अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जीआरपी, ओडिसाकडून अपघाताचे कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरु आहे' असं ट्वीट ओडिसा पोलिसांनी केलं आहे.
या रेल्वे अपघाताला काही लोकांकडून सोशल मीडियाद्वारे धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सामाजिक शांतता भंग होऊ शकते. ओडिसा पोलिस अलर्ट मोडवर आलेली असून कुणी असा प्रयत्न केल्यास कायदेशीर कावाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंट सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी ही पत्रकार परिषद घेतली. मालगाडीमध्ये लोहखनिज होतं, त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच प्राथमिक निष्कर्षांनुसार, सिग्नलिंगमध्ये काही समस्या होत्या. आम्ही अजूनही रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या सविस्तर अहवालाची वाट पाहत असून ट्रेनचा वेग सुमारे १२८ किमी होता असं स्पष्टीकरण वर्मा यांनी दिलं.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. तसेच याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांनी हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे झाल्याचा खुलासा केला.
या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. केंद्र सरकारवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांनी रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने कुठलंही पाऊल उचललेलं नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.