Odisha Train Accident : २३३ जणांचा जीव घेणारा तीन रेल्वेंचा अपघात नेमका झाला कसा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Odisha Train Accident  know what happened in balasore bengaluru howrah express coromandel express train accident
Odisha Train Accident know what happened in balasore bengaluru howrah express coromandel express train accident
Updated on

Odisha Train Accident : ओडिसा येथील बालासोर येथे शुक्रवारी (२ जून) संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून आधीक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर शनिवारी ओडिसा सरकारने सर्व सरकारू कार्यक्रम रद्द करत दुखवटा जाहीर केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जखमींना मदतीची घोषणा देखील केली आहे.

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचा आकडा वाढताना दिसत आहे. यादरम्यान नेमका कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटना कशी झाली याबद्दल लगेच माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र रात्रू उशीर ओडिसा सरकारने हा अपघात तीन रेल्वे रुळावरून घसरल्या आणि एकाच जागी त्यांचा भीषण अपघात झाल्याचे सांगितले.

Odisha Train Accident  know what happened in balasore bengaluru howrah express coromandel express train accident
UP च्या आधी गोपिनाथ मुंडेंनी मुंबईत घातला होता एन्काऊंटरचा पाया, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदही घाबरलेला!

तीन रेल्वेंचा अपघात झाला कसा?

२ जून रोजी सायंकाळी बेगळूरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस हावडा येथे जात होती तर याच वेळी या गाडीचे अनेक डब्बे रुळावरून घसरले. तर दुसरीकडून शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस या एक्सप्रेसच्या डब्ब्यांना धडकली. त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डब्बे समोरून येत असलेल्या मालगाडीच्या डब्ब्यांना धडकले. हा भीषण अपघात बालासोर जिल्ह्यातील बहांगा स्टेशनजवळ झाला.

ओडिसातील बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २३३ वर पोहोचली असून येथे रात्रभर बचावकार्य सुरू आहे. रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी झाली असून ओडिसाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने सांगितले की, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ३ जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही उत्सव साजरा होणार नाही.

Odisha Train Accident  know what happened in balasore bengaluru howrah express coromandel express train accident
Railway Accident History : ९ रेल्वे अपघात ज्यांनी संपूर्ण देशाला हादरवलं; जाणून घ्या भीषण अपघातांचा इतिहास

कसा घडला रेल्वे अपघात, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप?

  • बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस हावडा येथे जात होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरा या गाडीचे काही डबे रुळावरुन घसरून बाजूच्या रुळावर उलटले.

  • शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नईच्या दिशेने दुसऱ्या ट्रॅकवर धावत होती. ट्रेन बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या रुळावर उलटलेल्या डब्यांना धडकली.

  • या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आणि पुढील ट्रॅकवर येत असलेल्या मालगाडीच्या डब्यांना धडकले .

  • बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्टेशनवर हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे, जे कोलकात्यापासून २५० किमी दक्षिणेस आणि भुवनेश्वरच्या उत्तरेस १७० किमी आहे.

  • अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-हावडा सुपरफास्टचे डबे सायंकाळी ६.५५ वाजता रुळावरून घसरले, तर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे सायंकाळी ७ वाजता रुळावरून घसरले. म्हणजेच अवघ्या पाच मिनिटांच्या कालावधीत ही घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()