Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
Odisha train accident latest updates PIL Filed In Supreme Court Seeking Probe By Expert Panel Headed By retired Judge
Odisha train accident latest updates PIL Filed In Supreme Court Seeking Probe By Expert Panel Headed By retired Judge Sakal
Updated on

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वकील विशाल तिवारी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली समितीने करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 1,175 जखमींपैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा:

या समितीने चौकशी करून दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. या समितीमध्ये तांत्रिक तज्ञांचा समावेश केला पाहिजे.

जे सध्याच्या सुरक्षिततेच्या मापदंडांचे आणि रेल्वेच्या धोक्याचे मूल्यांकन करताना सूचना देतील. याशिवाय रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी इतर सुरक्षा यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांची सखोल चौकशी व्हायला हवी. (Odisha train accident latest updates PIL Filed In Supreme Court Seeking Probe By Expert Panel Headed By retired Judge)

Odisha train accident latest updates PIL Filed In Supreme Court Seeking Probe By Expert Panel Headed By retired Judge
Odisha Train Accident: भाजप नेत्यानेच केली रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; राजकीय गोटात खळबळ

याचिकेत यूनियन ऑफ इंडियाला पहिला पक्ष बनवण्यात आला आहे, ज्याचे प्रतिनिधित्व गृह मंत्रालयाकडून केले जाईल. दुसऱ्या क्रमांकावर रेल्वे वाहतूक व्यवस्था आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले रेल्वे मंत्रालय आहे.

तिसरा पक्ष भारतीय रेल्वे आहे, ज्याचे प्रतिनिधीत्व चेअरमन करतील. निवृत्त न्यायाधीशांव्यतिरिक्त निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करावी, असे याचिकेत म्हटले आहे. (PIL Filed In Supreme Court Seeking Probe By Expert Panel Headed By retired Judge)

जखमींसाठी 60 हून अधिक रुग्णवाहिका:

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. बचाव कार्यात हवाई दल आणि लष्करासह एनडीआरएफच्या पथकांचा सहभाग आहे. ओडिशा सरकारचे विशेष बचाव कार्य पथकही तैनात करण्यात आले आहे.

अपघातातील जखमींसाठी 60 हून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने चार रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातात बळी गेलेले बहुतांश बंगालचे रहिवासी आहेत. (Odisha Train Accident)

Odisha train accident latest updates PIL Filed In Supreme Court Seeking Probe By Expert Panel Headed By retired Judge
Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()