ओडिशाच्या बालासोरमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. तीन गाड्यांमधील भीषण अपघातात मृतांचा आकडा आता वाढला आहे. आज (शनिवार) दुपारपर्यंच 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 747 लोक जखमी झाले आहेत. तर 56 जण गंभीर जखमी आहेत.
मृत आणि जखमींचा आकडा अजून वाढू शकतो. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात दाखल जखमींची भेट घेतली. या दुर्घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. (Odisha Train Accident Update)
दरम्यान, दुर्घटनेतील मृतांबाबत एलआयसीने (LIC) ने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे अपघातात ज्यांच्या मृत्यू झाला त्यांचा विमा उतरविला असल्यास, असे दावे तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन एलआयसीने दिले आहे. तसेच दाव्यांसाठी प्रत्येक शाखेत स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मृत्यू प्रमाणपक्ष दिल्यास एलआयसीचे दावे तातडीने निकाली काढण्यात येणार आहे.
नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्राऐवजी रेल्वे, पोलीस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्रीय एजन्सीद्वारे प्रकाशित मृतांची यादी दाखवून ते विम्याच्या रकमेवर दावा करता येणार आहे. तसेच, विमा दाव्यांच्या प्रश्नांसाठी विभागीय आणि शाखा स्तरावर विशेष हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले आहेत. हे डेस्कही दावेदारांना मदत करतील.
बालासोर येथील रूग्णालयात पीडितांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ज्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्यासाठी हे अत्यंत वेदनादायक आणि संवेदनेच्या पलीकडे त्रासदायक आहे. जखमी झालेल्या कुटुंबीयांच्या उत्तम आरोग्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ही घटना सरकारसाठी अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक प्रकारच्या चौकशीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला सोडले जाणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.