Odisha Train Accident: ओडिसा दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले अन् ...

ओडिसातील बालासोर येथे सुमारे 51 तासांनंतर अपघातस्थळावरून पहिली ट्रेन निघाली
Odisha Train Accident
Odisha Train AccidentEsakal
Updated on

ओडिसामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. हि मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन ही मालगाडी रवाना झाली होती.(Latest Marathi News)

दरम्यान केद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलं आहे, "अपघातग्रस्त डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली असुन या भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे." तसेच, या ट्वीटनंतर काही वेळानंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आणि सांगितलं की, अप-लाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाली आहे."(Latest Marathi News)

Odisha Train Accident
समांतर जलवाहिनीचे काम थांबवले; ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका; ‘उजनी’च्या अभियंत्यांचे मनपा आयुक्तांना पत्र

दोन दिवसांनंतर अपघातग्रस्त भागातून ट्रेन रवाना झाली आहे. या ट्रेनचा व्हिडीओही ट्वीट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही तिथे उपस्थित आहेत. बयाना रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जाताच रेल्वेमंत्र्यांनी हस्तांदोलन केलं, त्यानंतर ट्रेनकडे पाहुन रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले आणि प्रार्थनाही केली. यावेळी रेल्वेमंत्री भावूक झाल्याचेही दिसुन आले.(Latest Marathi News)

Odisha Train Accident
Gyanvapi Case : ‘ज्ञानवापी’ प्रकरणातून हिंदू याचिकाकर्त्याची माघार; विविध गटांकडून छळ होत असल्याचे कारण

कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडलवर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. या अपघातात २५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक अपघात असल्याचं बोललं जात आहे.(Latest Marathi News)

Odisha Train Accident
Lok Sabha Election : नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देणार; अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.