नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या नावाने बनावट तयार करून खासदारांना मेसेज पाठवणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात ओम बिर्ला यांच्या कार्यालातून माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी ओडिसा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
(Crime News)
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने एक व्हॉटसअप अकाउंट काढण्यात आलं होतं. त्यासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यात आला होता असा असा आरोप बिर्ला यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला. खासदारांना मेसेज पाठवण्यासाठी 7862092008, 9480918283 आणि 9439073870 या मोबाईल नंबरचा वापर केला जात होता. यासंबंधित खासदारांनी लोकसभा अध्यक्ष कार्यालयाला सुचवल्यावर त्यासंबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून या नंबरवरुन येणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
दरम्यान या प्रकरणी ओडिसा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सायबर गुन्हेगारांशी संबंध असल्याचं बोललं जातंय. आधी या नंबरचे सीमकार्ड आरोपींनी खरेदी केले होते त्याच सीम कार्डचा वापर त्यांनी बिर्ला यांच्या नावाने बोगस व्हॉट्सअपसाठी केला आहे. याआधीही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नावानेही बोगस व्हॉट्सअप तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या व्यक्तींना मेसेज पाठवून पैशांची मदत मागितली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाने यासंबंधीत गृहमंत्रायलयाकडे तक्रार केली होती व आरोपींना अटक करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.