NDA : अखिलेश यादवांचे काका एनडीएमध्ये सामील होणार; बड्या नेत्याचा दावा

akhilesh yadav and shivpal yadav
akhilesh yadav and shivpal yadav
Updated on

नवी दिल्ली - सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय (एसबीएसपी) अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएत प्रवेश केल्यापासून विरोधकांवर हल्ला बोल करत आहेत. गोरखपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात लवकरच समाजवादी पक्षाची जागा आमचा एसबीएसपी घेईल.

akhilesh yadav and shivpal yadav
Sambhaji Bhide : ''भिडेंची तिरंग्याच्या विरोधात रॅली... आता गुरुजीच्या विद्यार्थ्यांची भूमिका काय?'' वडेट्टीवारांचा थेट हल्ला

महिलांना संघटित करण्याचे काम आमच्या पक्षाने केले आहे. एसबीएसपीच्या कार्यक्रमाला १० ते २० हजार लोक जमतात. मैनपुरी, सहारनपूर, झाशी आणि गोरखपूर येथील सभा सुभासपाची ताकद दर्शवतात, असे राजभर म्हणाले. आज प्रत्येक पक्षाला एसबीएसपीला सोबत घ्यायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एसबीएसपी-सपाची युती झाली होती. युतीने १२५ जागा जिंकल्या होत्या, पण आता 'सपा'सोबतचे नाते संपुष्टात आल्याचं राजभर म्हणाले.

akhilesh yadav and shivpal yadav
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री इर्शाळवाडीत! लोकांच्या रोजगाराचा सोडवणार प्रश्न, व्यवसायासाठी सरकार करणार आर्थिक मदत

राजभर म्हणाले की, सपाचे लोकसभा निवडणुकीत खातेही उघडणार नाही. त्यामुळे समाजवादी पक्ष नाराज आहे. शिवपाल यादव यांनाही वास्तव माहित आहे. संसदेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर हल्ला चढवत राजभर म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती स्पष्ट झाली आहे. विरोधकांच्या ऐक्यात काहीच दम नाही. त्यामुळे ते निवडणूक जिंकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा लढवण्याचे आव्हान त्यांनी समाजवादी पक्षाला दिले.

शिवपाल यादव यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर ओमप्रकाश राजभर म्हणाले की, सपात परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट शिवपाल यादव स्वत: एनडीएत प्रवेश करणार आहेत. ते लोकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.