बनिहाल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आलेली असताना आज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला पदयात्रेत सामील झाले. आपण देशाच्या स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी पदयात्रेत सहभागी झालो असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
श्रीनगरपासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या बनिहाल येथे उमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उमर म्हणाले, की भारत जोडो यात्रा ही राहुल गांधी यांची प्रतिमा उजळण्यासाठी नाही तर देशातील सद्यःस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी काढली जात आहे. देशाच्या स्थितीवरून आपण अधिक चिंतेत असल्याने पदयात्रेत सामील झाल्याचे उमर म्हणाले.
आम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमेसाठी नाही तर देशाच्या प्रतिमेसाठी पदयात्रेत सहभागी होत आहोत. राहुल गांधी यांनी वैयक्तिक उद्देशातून पदयात्रा सुरू केलेली नाही. देशात धार्मिक तणाव निर्माण होत आहे.तसेच जाणीवपूर्वक अल्पसंख्याकाना टार्गेट करण्याचे प्रयत्न होत असल्याने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली, असे उमर अब्दुल्ला म्हणाले.
केंद्र सरकार अरब देशांशी मैत्री करत असली तरी प्रत्यक्षात या सरकारमध्ये अल्पसंख्याक समुदायाचे कोणीही प्रतिनिधी नाही. लोकसभा आणि राज्यसभेत सत्तारूढ पक्षाकडून अल्पसंख्याक समुदायाला कोणत्याच प्रकारचे प्रतिनिधित्व न देण्याची पहिलीच वेळ असावी आणि त्यावरून सरकारची भूमिका कळते, असे उमर म्हणाले.
कलम ३७० वगळण्याच्या निर्णयाबाबत उमर अब्दुल्ला यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ३७० कलम पुन्हा लागू करण्यासाठी न्यायालयात जाऊ. यासंदर्भातील याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्याचे सरकारकडून होणारे प्रयत्न पाहता आमची स्थिती मजबूत आहे, असे दिसते. २०१४ मध्ये काश्मीर खोऱ्यात विधानसभा निवडणुका झाल्या.
दोन विधानसभेतील अंतर खूप अधिक आहे. खोऱ्यात दहशतवादाने कळस गाठलेला असताना देखील निवडणूक लांबणीवर पडलेली नव्हती. काश्मीरच्या लोकांनी निवडणुकांसाठी मनधरणी करावी, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.पण आम्ही भिकारी नाही आणि आम्ही यासाठी भीक मागणार नाही, असे उमर अब्दुल्ला म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.