Omicron सौम्य? पाहा काय सांगतायत बाधित झालेले एम्सचे डॉक्टर

Omicron व्हेरीअंटला हलक्यात घेऊ नका असा इशारा WHO नं दिला होता.
Omicron
Omicron Team eSakal
Updated on

भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं (Covid19 Third Wave) कहर करायला सुरूवात केली आहे. त्यातच ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटनं देखील देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाय पसरले आहेत. तसेच, डब्ल्यूएचओचे (WHO) प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी अलीकडेच एक इशारा देत हे सांगितलं होतं की ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांबद्दल बोलताना एम्स जोधपूरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनीही 'ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका' असा इशारा दिला आहे.

Omicron
Manipur Election : प्रादेशिक पक्षांतील स्पर्धा भाजपच्या पथ्यावर?

बालरोग विभागात काम करणारे डॉक्टर तन्मय मोतीवाला हे बुधवारी कोरोनाबाधित झाले. ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. ते म्हणतात की, मी कदाचित आयसीयूमधील रुग्णाच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला, अशक्तपणा जाणवू लागला, त्यानंतर मी स्वतःला विलगणीकरणात ठेवलं. ते म्हणाले यापूर्वीही डॉक्टरांना संसर्ग झाला होता. मात्र यावेळी ही संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी संपूर्ण विभाग कोविड पॉझिटिव्ह आला. हे खरोखरच चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे किंवा नवीन प्रकार सौम्य असल्याचं अधिकारी सांगत आहेत. मात्र आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने आधीच यंत्रणेवर भार पडला आहे. एका वर्षभरापासून आमच्याकडे 40,000 कनिष्ठ डॉक्टर नव्हते.

Omicron
Goa Election : भाजपला पर्रिकरांची उणीव भासणार

डॉ. मोतीवाला म्हणाले की, ज्या लोकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना लक्षणं सौम्य असू शकतात. मात्र धोका असलेल्यांसाठी ओमिक्रॉन घातक ठरू शकतो. चांगली प्रतिकारशक्ती असलेले लोक ते टाळू शकतात, मात्र त्यांच्यामुळे लिषाणु इतर लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे सर्वांनीच सतर्क होणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()