नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनचे रुग्ण (India Omicron Cases) झपाट्याने वाढत आहेत. सध्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ३५८ वर पोहोचली असून आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. दीड ते तीन दिवसात रुग्ण दुप्पट (Omicron Cases Doubling Rate) होत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) केलं आहे.
डेल्टापेक्षा ओमिक्रॉनचा संक्रमण दर जास्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच सांगितलं आहे. तसेच देशात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत ५३८ रुग्ण आढळून आले असून यापैकी ११४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा पहिला व्हेरियंट आणि डेल्टा वर जे उपचार केले जात होते, तीच उपचार पद्धती ओमिक्रॉनसाठी वापरली जात आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजनच्या मागणीत दहा पट वाढ झाली असून दररोज दररोज 18,800 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ८९ टक्के प्रौढ लोकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे, तर ६१ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही ११ राज्यांमध्ये लसीकरण मोहीम सरासरीपेक्षा कमी आहे, याबाबत आरोग्य मंत्रालयानं चिंता व्यक्त केली.
३१ डिसेंबरच्या पार्ट्या आणि नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये यासाठी रात्रीचा कर्फ्यू लावण्यात यावा. तसेच बेडची क्षमता वाढविण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यापूर्वीच दिला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.