ख्रिसमस, नवीन वर्षासाठी या राज्यांनी लादले निर्बंध

केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे
omicron
omicronomicron
Updated on

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉनची (Omicron) प्रकरणे भारतात वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण २१३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ प्रकरणे, तर दिल्लीत ५७ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ओमिक्रॉन झपाट्याने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी (New year Party) निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले (Strict steps) उचलण्याचे निर्देश (Central Government directs states) दिले आहेत. केंद्राने ओमिक्रॉनचे रुग्ण डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट संसर्गजन्य असल्याचे वर्णन केले आहे आणि कोविडसाठी राज्य सरकारांनी तयार केलेल्या वॉर रूम्स सक्रिय करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने म्हटले आहे, चाचणी आणि पाळत ठेवण्याव्यतिरिक्त रात्रीचा कर्फ्यू लागू करणे, मोठ्या मेळाव्यावर बंदी घालणे, लग्न आणि अंत्यविधींमध्ये लोकांची संख्या मर्यादित करणे यासारखी पावले उचलली जावीत.

omicron
नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पगार आणि पीएफमध्ये होईल बदल

महाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ६५ रुग्ण आढळले असून, देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकारने १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम १४४ अंतर्गत बंदी लागू केली आहे. राज्यात ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्यांनाच दुकाने किंवा सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. दोनशे पेक्षा जास्त लोकांच्या मेळाव्यासाठी व्यावसायिक जागेच्या मालकांना त्यांच्या प्रभाग अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल.

दिल्ली

दिल्लीत आतापर्यंत ओमिक्रॉनची (Omicron) ५७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोना ३१ डिसेंबरपर्यंत वाढवले ​​आहेत. यासोबतच ख्रिसमस आणि नवीन वर्षात सामाजिक आणि सांस्कृतिक मेळाव्यावर बंदी घातली आहे. या दरम्यान, ५० टक्के लोकांना रेस्टॉरंट आणि पबमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. बँक्वेट हॉल, विवाहसोहळा आणि इतर मेळाव्यातही असेच नियम पाळले जातील.

गुजरात

गुजरातमध्ये ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २३ झाली आहे. यापैकी चार जणांना संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडले, तर १९ जणांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रात्रीचा कर्फ्यू (दुपारी १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत) ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. जिम आणि रेस्टॉरंट्स ७५ टक्के क्षमतेने चालू शकतात, तर सिनेमा हॉल पूर्ण क्षमतेने उघडता येतात.

omicron
शाळेत मुलाने लिहिलेले वाक्य पाहून शिक्षिकेला बसला धक्का

कर्नाटक

कर्नाटकात आतापर्यंत ओमिक्रॉनची (Omicron) १९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्य सरकारने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बेंगळुरूमधील एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवरील सर्व सार्वजनिक मेळाव्यास बंदी घातली आहे. राज्याच्या कोणत्याही भागात सार्वजनिक उत्सव आणि विशेष कार्यक्रम होणार नाहीत. क्लब आणि रेस्टॉरंटना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत लोकांना ठेवण्याची परवानगी आहे. परंतु, कोणत्याही डीजे किंवा नवीन वर्षाच्या पार्टीला परवानगी नाही.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे दोन प्रकरणे नोंदवली गेली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या ताज्या आदेशांनुसार ओमिक्रॉन प्रकरणांची कमी संख्या लक्षात घेऊन ख्रिसमस आणि नवीन वर्षावरील निर्बंध शिथिल केले जातील. तथापि, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवस वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंतच्या हालचालींवर बंदी १५ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे.

उत्तर प्रदेश

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत CrPC अंतर्गत कलम १४४ लागू केले आहे.

राजस्थान आणि तेलंगणा

राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचे १८ आणि तेलंगणामध्ये २४ प्रकरणे समोर आली आहेत. या दोन राज्यांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान अद्याप कोणतेही निर्बंध जाहीर करण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.