ओमिक्रॉन, डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने होतो संक्रमित; अभ्यासकांचा दावा

Omicron variant
Omicron variantSakal media
Updated on

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल (Omicron Variant) जगभरात भीती व्यक्त केली जात आहे या दरम्यानच एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमध्ये 70 पट वेगाने संक्रमित होण्याची क्षमता आहे. त्याच अभ्यासात असेही म्हटले आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे परिणाम अधिक गंभीर होणार नाहीत. या रिपोर्टनुसार ओमिक्रॉन डेल्टा (Delta) आणि कोविड-19 च्या (Covid-19) मूळ स्ट्रेनपेक्षा अधिक प्रभावीपणे संक्रमित होऊ शकतो.

हाँगकाँग विद्यापीठातीलील (University of Hong Kong) संशोधकांनी केलेल्या आभ्यासात असे आढळून आले आहे की, ओमिक्रॉन मानवी श्वासन क्षमतेस डेल्टा व्हेरिएंट आणि त्याच्या मूळ SARS-CoV-2 फॉर्मपेक्षा 70 पट वेगाने संक्रमित करू शकतो. यामुळे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा तो वेगाने का प्रसारित होत आहे. आभ्यासात असेही दिसून आले आहे की, ओमिक्रॉन संसर्ग फुफ्फुसांना कोरोनाच्या वास्तविक स्ट्रेनपेक्षा कमी संक्रमित करतो. त्यामुळे या आजाराची तीव्रता कमी असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. संशोधकांनी या अभ्यासासाठी श्वसनमार्गाच्या एक्स-व्हिवो कल्चर्स (Ex-Vivo Cultures)चा वापर करण्यात आला.

Omicron variant
Realme GT Neo 2, Narzo 50A सह अनेक स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट

हाँगकाँग विद्यापिठाचे सहाय्यक प्राध्यापक मायकेल चॅन ची-वाई आणि त्यांच्या टीमने ओमिक्रॉन विषाणूला यशस्वीरित्या वेगळे करत त्याची तुलना डेल्टा आणि 2020 कोरोनाच्या मूळ फॉर्मशी केली आणि तो वेगाने पसरण्यास सक्षम असल्याचा निष्कर्ष काढला आहे. संसर्गानंतर 24 तासांनी, ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा आणि मूळ SARS-CoV-2 व्हायरसपेक्षा सुमारे 70 पटीने जास्त संक्रमीत झाला, असे संशोधकांनी सांगितले.

प्राध्यापकांनी असेही सांगितले की, मानवांमध्ये रोगाची तीव्रता केवळ विषाणूवर अवलंबून नाही तर ती मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर देखील अवलंबून असते. तसेच या आभ्यासातून हा व्हायरस स्वतः कमी रोगजनक असला तरीही खूप वेगाने पसरणारा हा व्हायरस अनेक लोकांचा जीव घेऊ शकतो असे देखील सांगण्यात आले आहे.

Omicron variant
Omicron मुळे चिंता वाढली, UK मध्ये एका दिवसात ७८,६१० कोरोना रुग्णांची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()