Omicron BF.7 : दिवाळीपूर्वी नव्या व्हेरिएंटची भीती; जाणून घ्या, लक्षणं

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या BF.7 या नवीन सब-व्हेरियंटने भारतासह जगभरातील लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.
Corona
Coronasakal
Updated on

Omicron Subvariant BF.7 in India : सणासुदीचा हंगाम सुरू असून, येत्या दोन दिवसात दिवाळी येणार आहे. त्याआधी भारतात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटने दार ठोठावले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या BF.7 या नवीन सब-व्हेरियंटने भारतासह जगभरातील लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

Corona
XBB Variant: कोरोनाचा घातक अन् वेगाने पसरणारा Variant, भारतातही शिरकाव, वाचा लक्षणं

हा व्हेरिएंट संसर्गजन्य असल्याचे मानले जात असून, सणासुदीच्या काळात त्याच्या प्रसारामुळे पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सर्वात प्रथम उत्तर पश्चिम चीनच्या मंगोलिया प्रदेशात आढळून आला. यानंतर येथील कोरोना बाधितांची संख्या झापाट्याने वाढली आहेत.

Corona
जगभर पुन्हा पसरतोय कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट; भारतात प्रशासन अलर्ट

BF.7 चे रूग्ण आतापर्यंत यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमसह अनेक देशांमध्ये आढळून आली असून, हा सब-व्हेरियंट भारतातही दाखल झाला असून, BF.7 चा पहिला रूग्ण गुजरातमधील बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Corona
Corona New Variant : आंतरराष्ट्रीय विमानांवर निर्बंध?, मोदींचे संकेत

Omicron BF.7 ची लक्षणं

  • सतत खोकला

  • ऐकण्यात अडचण

  • छातीत दुखणे

  • थरथरणे

  • वासाच्या भावनेत बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.