Omicron test kit आजपासून दुकानांत उपलब्ध, जाणून घ्या किंमत व माहिती

omicron
omicronesakal
Updated on

देशात कोरोनाचे (corona virus) नवीन प्रकार ओमिक्रॉनची (omicron) लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात सुमारे पाच हजार रुग्ण आढळले आहेत. पण या सगळ्याच्या दरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे की, आता जर तुम्हाला या कोरोनाचा नवा व्हेरिएंट (omicron) ची लागण झाली असेल, तर तुम्ही लगेच त्याची टेस्ट करू शकता. दरम्यान, आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून, Omicron चे टेस्ट किट मार्केट आणि दुकानांमध्ये उपलब्ध होणारआहे.

किती वेळात मिळणार omicron रिपोर्ट? जाणून घ्या माहिती

ICMR च्या वतीने, Tata Medical and Diagnostics Limited च्या Omicron चाचणी किट Omisure ला 30 डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली. Omisure चाचणी किट इतर RT-PCR चाचणी किट प्रमाणेच कार्य करेल. या किटच्या साहाय्याने टेस्टसाठी नाक किंवा तोंडातून स्वॅब देखील घेतला जाईल. त्यानंतर चाचणीचा अंतिम अहवाल म्हणजेच रिपोर्ट इतर RT-PCR चाचण्यांप्रमाणेच फक्त 10 ते 15 मिनिटांत येईल. Omisure ची टेस्ट करण्याची पद्धत इतर RT-PCR चाचण्यांपेक्षा वेगळी असणार नाही.

omicron
मलिकांवर भाजप नेत्याचा पुन्हा निशाणा, 'फिर लेनी पड़ेगी मियाँको..!'

जाणून घ्या किंमत

omisure चाचणी किटची किंमत टाटा मेडिकलने OmiSure टेस्ट किट (OmiSure) ची किंमत प्रति चाचणी 250 रुपये निश्चित केली आहे, जी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर चाचणी किटपेक्षा स्वस्त आहे. तथापि, चाचणीसाठी प्रयोगशाळांकडून अतिरिक्त शुल्क जोडले जाऊ शकते कारण ही घरगुती चाचणी नाही.

ही चाचणी घरी करता येत नाही

तुम्ही या किटसह घरी चाचणी करू शकत नाही, त्यामुळे खाजगी लॅबकडून याबाबत स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाऊ शकते. दरम्यान, टाटा एमडीची सध्या दरमहा २,००,००० चाचणी किट तयार करण्याची क्षमता आहे. हे टेस्ट किट्स कंपनी ते परदेशात विकण्याचा विचार करत आहे. तसेच युरोपियन युनियन आणि यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला आहे.

omicron
देशात २४ तासात १ लाख ९४ हजार नवे रुग्ण; ४४२ जणांचा मृत्यू

ओडिशाने पाच लाख टेस्ट किट्स मागवल्या

Odisha State Medical Corporation Limited (OSMCL) ने पाच लाख Omisure RT-PCR किट्सची ऑर्डर दिली आहे. असे करणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य बनले आहे, ज्याने कोविड-19 पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन टेस्ट किटची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.