मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करा, केंद्राच्या महाराष्ट्र सरकारला सूचना

Covid-19 Guidelines
Covid-19 Guidelinesgoogle
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार सर्व देशासाठी एकसमान मार्गदर्शक तत्व (India Covid-19 Guidelines) आहेत. ते सर्व राज्यांनी पाळावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Health Ministry) सांगण्यात आले. आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शक तत्वांमध्ये (Maharashtra Covid-19 Guidelines) सुधारणा करण्यास सांगितले आहे.

Covid-19 Guidelines
Omicron : देशातील कोणत्या राज्यात काय निर्बंध? जाणून घ्या

आरोग्य मंत्रालयाने रविवारी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे उद्भवलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली होती. आता केंद्राने सांगितले की महाराष्ट्राची मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा वेगळी आहेत आणि केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सर्व राज्यांसाठी महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या चार मार्गदर्शक सूचना वेगळ्या असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या कोणत्या नियमांवर केंद्राचा आक्षेप? -

महाराष्ट्राने मुंबई विमानतळावर येणार्‍या जोखीम असलेल्या देशांचा विचार न करता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCR चाचण्या अनिवार्य केल्या होत्या. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही 14-दिवसांच्या होम क्वारंटाईनची सूचना केली होती. शिवाय, मुंबईत उतरल्यानंतर कनेक्टिंग फ्लाइट घेण्याऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यास पुढील प्रवासाला परवानगी मिळणार होती. राज्याने इतर राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांना प्रवासाच्या किमान ४८ तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवण्यास सांगितले होते. हे सर्व नियम आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा वेगळे आहेत.

आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे कोणती?

  1. जोखीम असलेल्या देशातून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळावर आल्यानंतर कोविड-19 चाचणीसाठी नमुने सादर करावे लागतील. या प्रवाश्यांना बाहेर पडण्यापूर्वी किंवा कनेक्टिंग फ्लाइट घेण्यापूर्वी त्यांच्या कोरोना अहवालाची प्रतिक्षा करावी लागेल.

  2. निगेटिव्ह आलेल्या लोकांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. आठव्या दिवशी त्यांची पुन्हा चाचणी करावी लागणार आहे. जर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तर त्यांना पुढील सात दिवस त्यांच्या आरोग्याचे स्वतः निरीक्षण करावे लागेल.

  3. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व लोकांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेंससाठी पाठवले जातील.

  4. जे लोक पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना वेगळ्या आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. तसेच त्यांच्यावर ठरलेल्या नियमांनुसार उपचार केले जातील.

  5. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागेल. प्रोटोकॉलनुसार संबंधित राज्य सरकारकडून त्यांच्यावर कडक नजर ठेवली जाईल.

अधिक जोखीम असलेले देश कोणते?

केंद्राने या श्रेणीतील 11 देशांची यादी केली आहे. त्यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे.

इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी काय नियम आहेत?

  1. इतर देशांतील प्रवाशांना विमानतळ सोडण्याची परवानगी दिली जाईल. त्यांना आल्यानंतर 14 दिवस त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचे स्वतः निरीक्षण करावे लागेल. तसेच विमानातील एकूण प्रवाशांपैकी ५ टक्के प्रवाशांना विमानतळावर आल्यानंतर कोरोनाची चाचणी करावी लागेल.

  2. होम क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या प्रवाशांना नंतर लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, त्यांना ताबडतोब स्वविलगीकरणात जावे लागेल आणि त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.