ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात 11 सप्टेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी काल निधन झालं आहे.
Queen Elizabeth II
Queen Elizabeth IIesakal
Updated on
Summary

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी काल निधन झालं आहे.

Queen Elizabeth II : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी काल निधन झालं. राणी एलिझाबेथ II च्या डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं, मात्र त्यांना वाचवता आलं नाही.

बर्लिंगहॅम पॅलेसमधून मिळालेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय गेल्या वर्षापासून एपिसोडिक मोबिलिटीच्या समस्येनं त्रस्त होत्या. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ राज्य केलं आहे. जवळपास 70 वर्षे त्या ब्रिटनच्या राणी होत्या. यूके रॉयल फॅमिलीच्या ट्विटर हँडलवरून काल अशी माहिती देण्यात आली की, "जगातील सर्वात वृद्ध राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं आहे." राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स यांना आता देशाचा नवा राजा घोषित करण्यात येणार आहे. प्रिन्स चार्ल्स हा राणी एलिझाबेथ II चा मोठा मुलगा आहे.

Queen Elizabeth II
Rajasthan : जीप-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानंही दु:ख व्यक्त केलंय. भारतानं एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिलेत. भारताच्या गृह मंत्रालयानं हा आदेश जारी केलाय. 11 सप्टेंबरला संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.