18-44 वयाच्या लोकांना ऑनलाईन अपॉइंटमेंटशिवाय मिळणार लस

vaccination
vaccinationesakal
Updated on
Summary

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी लसीकऱण (Vaccination) मोहिम सुरु आहे. यासाठी कोविन अॅप (COWIN App) असून त्यावर नोंदणी करून लस घेता येते. सुरुवातीला सुरळीत सुरु असणारे पोर्टल जेव्हा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केल्यानंतर मात्र डाऊन झाले. त्यानंतर बुकींग करणं, स्लॉट ठरवणं यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. आता सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोणत्याही पूर्व नोंदणीशिवाय सरकारी लसीकरण केंद्रावर लस घेता येणार आहे. याची सुरुवात आजपासून झाली आहे. (on site vaccination for 18 to 44 age group to all government centre)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. मात्र रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर लस मिळू शकते. तसंच रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला लस दिली जाईल. ऑनलाइन अपॉइंटमेंट दरम्यान अनेक ठिकाणी लस वाया गेल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रालयाने असंही स्पष्ट केलं आहे की, ही सुविधा सध्या फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच उपलब्ध असेल. आतापर्यंत लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील लोकांनाच अपॉइंटमेंटशिवाय लस दिली जात होती. तर 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन स्लॉट बुकिंग करावं लागत होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()