Ashadhi Ekadashi 2024 : राजधानीत विठूनामाचा गजर

आषाढी एकादशीनिमित्त देशाची राजधानी दिल्लीमध्ये मराठी बांधवांनी बुधवारी विठूनामाचा गजर केला. कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिर ते आर. के. पूरम येथील विठ्ठल मंदिरापर्यंत यानिमित्त सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले होते.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024sakal
Updated on

नवी दिल्ली : आषाढी एकादशीनिमित्त देशाची राजधानी दिल्लीमध्ये मराठी बांधवांनी बुधवारी विठूनामाचा गजर केला. कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिर ते आर. के. पूरम येथील विठ्ठल मंदिरापर्यंत यानिमित्त सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले.

आषाढी एकादशीनिमित्त दिल्लीत दरवर्षी सांकेतिक वारीचे आयोजन केले जाते. यंदा या वारीत मराठी बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. सकाळी सहा वाजता सुरु झालेली वारी १० वाजता विठ्ठल मंदिरात पोहोचली. यानिमित्ताने विठ्ठल मंदिरात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नादब्रम्ह सोनवणे महाराज यांचे भजन तर जगन्नाथ महाराज सोनवणे यांचे कीर्तन यावेळी झाले. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांकेतिक वारीत दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, भाजपचे खासदार मनोज तिवारी, बांसुरी स्वराज आदी मान्यवर उपस्थित होते.

‘विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्यासोबत असू द्या’

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असू द्या. आपल्या सर्वांना आनंद आणि समृध्दीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यात भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपणास प्रेरणा मिळू दे, असा संदेश मोदी यांनी मराठीतून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.