एकदा खासदार झालं की कधीपर्यंत मिळते पेन्शन? संसद सदस्याला काय-काय मिळतात सुविधा? जाणून घ्या

What facilities does a Member of Parliament get? पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. खासदार आता संसदेचे अधिकृत सदस्य झालेले असल्याने त्यांना सरकारी सुविधा मिळण्यास सुरुवात होईल.
Parliament
Parliament
Updated on

नवी दिल्ली- १८ व्या लोकसभेचे पहिले अधिविशेन २४ जूनपासून सुरू झालं आहे. नवनिर्वाचित खासदार संसदेमध्ये शपथ घेत आहेत. शपथ घेतल्यानंतर ते संसदेचे सदस्य होतील. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. खासदार आता संसदेचे अधिकृत सदस्य झालेले असल्याने त्यांना सरकारी सुविधा मिळण्यास सुरुवात होईल. त्यांना नेमक्या काय-काय सुविधा मिळतील हे आपण पाहुया.

खासदारांना मिळतो आलिशान बंगला

खासदारांना अनेक सोयी-सुविधा मिळत असतात. त्यामध्ये खासदारांना दिल्लीमध्ये एक बंगला मिळत असतो. याशिवाय, त्यांना दर महिन्याला वेतन आणि आयुष्यभर पेन्शन मिळत असते. मोफत विमान प्रवास, रेल्वे आणि बस प्रवास करता येतो. तसेच मोफत टेलीफोन आणि इंटरनेट सुविधा मिळत असते. खासदाराच्या कुटुंबावर मोफत उपचार घेता येतो.

Parliament
Parliament Session 2024: नरेंद्र मोदी शपथ घ्यायला जात असताना राहुल गांधींनी हात उंचावून का दाखवले संविधान? पहिल्या दिवशीच राडा

खासदाराला दर महिन्याला जवळपास १ लाख रुपये पगार मिळत असतो. त्यासोबत विविध प्रकारचे भत्ते खासदारांना मिळत असतात. सरकारी कामासाठी वाहनाची सुविधा देखील मिळत असते. २ हजार रुपये मिटिंग अलाऊन्स देखील मिळत असतो. कर्तव्य पार पाडत असताना खासदारांना काही अडचण येऊ नये यासाठी त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात.

खासदाराला मिळत असलेल्या इतर काही सुविधा

-खासदाराला पाणीपट्टी आणि वीज बिल भरावा लागत नाही. एका विशिष्ट रकमेपर्यंत फर्निचरवर खर्च करता येतो. घरातील काही सफाई करण्यासाठी देखील त्यांना काही पैसे मिळत असतात. घरातील स्वयंपाळी, माळी यांना देण्यासाठी देखील खासदारांना काही प्रमाणात भत्ता मिळत असतो.

Parliament
'रवींद्र वायकरांचं जिंकणं शंकास्पद, त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नका'; 'या' पक्षानं थेट लोकसभा सरचिटणीसांना धाडली नोटीस

-अलाऊन्स अँड पेन्शन ऑफ मेंमर ऑफ पार्लिमेंट अॅक्ट, २०१० नुसार, संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना दिवसाला २ हजार रुपये मिळतात. मतदारसंघाच्या खर्चासाठी त्यांना दर महिन्याला ४५ हजार भत्ता दिला जातो.

-वर्षातून खासदाराला त्याच्या एका सोबत्यासोबत ३४ वेळा विमान प्रवास करता येतो. कार्यालयाच्या खर्चासाठी ४५ हजारांचा भत्ता देखील खासदारांना मिळतो. याशिवाय काही वस्तू खरेदी करण्यासाठी आणि पत्र पाठवण्यासाठी दर महिन्याला १५ हजार रुपये मिळतात.

एकदा खासदार झाल्यानंतर नेत्याला आयुष्यभर पेन्शन मिळत असते. खासदाराला दर महिनाला २२ हजार पेन्शन मिळत असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.