सरकारकडून गृहज्योती योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत मिळत आहे.
बेळगाव : राज्य सरकारकडून गृहज्योती योजनेंतर्गत (Karnataka Gruha Jyothi Scheme 2023) प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत मिळत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ कोटी अर्ज दाखल झाले आहेत. पैकी हेस्कॉम कार्यकक्षेतील अर्जांची संख्या २१ लाख ९ हजार ४७३ झाली आहे.
गृहज्योती योजनेखाली सरकारने २०० युनिट मोफत वीज (Free Electricity) देण्याची घोषणा केली असून, त्याची जुलै महिन्यापासून कार्यवाही सुरू केली जात आहे. योजनेची अंमलबजावणी सर्व पाच संस्थांत म्हणजे बेस्कॉम, सीईएससी, जेस्कॉम, हेस्कॉम (Hescom) व एचआरईसीएसमध्ये केली जात आहे.
पाचही संस्थांकडे गृहज्योतीसाठी दाखल अर्जांची संख्या १ कोटी २० हजार १६३ झाली आहे. यात १८ जून ते ३ जुलैदरम्यान ९५ लाख १२ हजार २७६ अर्ज दाखल झाले आहे, तर ४ जुलैला २ लाख ९४ हजार ४२२ व ५ जुलैला २ लाख १३ हजार ४६५ अर्ज दाखल झाले आहे. यात हेस्कॉमकडे आतापर्यंत २१ लाख ९ हजार ४७३ अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान, सरकारकडून गृहज्योती योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत मिळत आहे. त्यामुळे २५ जुलैपूर्वी नावनोंदणी करणाऱ्या ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात मोफत योजनेचा लाभ मिळणार आहे, तर २५ जुलै ते २५ ऑगस्टदरम्यान योजनेसाठी नाव नोंदविणाऱ्यांना सप्टेंबरमध्ये योजनेचा लाभ मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.