Patna Viral News- बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये एक वेगळा प्रकार समोर आला आहे. एका गाढवाच्या मृत्यूनंतर ५५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, गाढवाचा मृत्यू मागील आठवड्यात विजेच्या खांबातून करंट लागल्याने झाला होता.
सदर प्रकरणात पंचायत प्रतिनिधी आणि गावकरी यांनी स्थानिक पॉवर ग्रिड गाठलं आणि त्याठिकाणी राडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकारामुळे तब्बल अडीच तास वीज सेवा खंडित झाली, यामुळे एकूण १ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पॉवर ग्रिडच्या ज्यूनियर इंजिनीअरनी दिली आहे.