शंभर दिवस, सहा महिने अन् वर्षाचे लक्ष्य; योगींचा प्रत्येक खात्याला आदेश

Yogi Adityanath
Yogi AdityanathYogi Adityanath
Updated on

नवी दिल्ली : प्रत्येक खात्याने १०० दिवस, सहा महिने आणि एका वर्षाचे उद्दिष्ट निश्चित करावीत असा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. प्राधान्य देण्याची गरज असलेली दहा क्षेत्रे निश्चित करावीत आणि राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविण्यासाठी त्या क्षेत्रांत झटून काम करावे, असेही त्यांनी नमूद केले. (Yogi Aditynath)

Yogi Adityanath
मायकल शुमाकरच्या मुलाचा भीषण अपघात; कारच्या उडाल्या ठिकऱ्या

योजना भवनात त्यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्य सचिव, महसुल मंडळ अध्यक्ष, कृषी उत्पादन आयुक्त, अतिरिक्त मुख्य सचिव, आदी त्यावेळी उपस्थित होते. विविध खात्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले. योगी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नव्या भारतात नवा उत्तर प्रदेश आकारास येत आहे. हे काम त्वरेने तडीस नेण्यात यावे. प्रशासनामधील गैरप्रकारांचे निर्मुलन हे आपल्यासमोरील पहिले आव्हान आहे, पण गेल्या पाच वर्षांत सुशासन निर्माण झाले आहे. भाजपने लोककल्याण संकल्पपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यातील आश्वासने पाच वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Yogi Aditynath)

Yogi Adityanath
Swiss Open 2022 : पीव्ही सिंधूचा एकहाती विजय; जेतेपदावर कोरले नाव

भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोचविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरावर त्यांनी भर दिला. सरकारी कार्यालयांत वेगवान आणि वक्तशीर कार्यपद्धती निर्माण होण्यासाठी त्यांनी इ-कार्यालय योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्यास सांगितले. पंचायत सहाय्यकांची नियुक्ती करून पंचायती राज व ग्रामसचिवांचा कारभार आणखी सुधारण्यात यावा असे त्यांनी नमूद केले. गाव पातळीवरील महसूल अधिकाऱ्यांनी चौपाल उपक्रम नियमित घ्यावा, ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पंचायती राज संस्था व ग्रामविकास खात्याने एकत्रित प्रयत्न करावेत, केंद्र सरकारच्या पत्रांना एका आठवड्यात उत्तर द्यावे, जनतेशी नियमित संवाद साधावा, सरकारच्या कामाविषयी जनतेच्या प्रतिसादाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला वेळोवेळी कळवावी, आदी सूचनाही त्यांनी दिल्या. (Yogi Aditynath)

आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील कामगिरीशीच स्पर्धा करावी आणि सुशासन आणखी भक्कम करावे असे आवाहन मी करीत आहे. यासंदर्भात आपली स्पर्धा स्वतःशीच असेल. आपल्याला चांगला कारभार आणखी जोमाने पुढे न्यावा लागेल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. (Yogi Aditynath)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.