One Nation, One Election: 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट! रामनाथ कोविंद यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन

देशात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याबाबत अर्थात 'वन नेशन, वन इलेक्शन' सध्या पडताळणी केली जात आहे.
One Nation, One Election
One Nation, One ElectionEsakal
Updated on

नवी दिल्ली : देशात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याबाबत अर्थात 'वन नेशन, वन इलेक्शन' सध्या पडताळणी केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. पण इतके दिवस हा विषय चर्चेत नसताना अचानक आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. (One Nation One Election high level committee headed by Ram Nath Kovind invites public suggestions)

माजी राष्ट्रपतींचं आवाहन

'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत अपडेट अशी की, यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेकडून याबाबत सूचना मागवल्या आहेत. यासाठी समितीच्या वेबसाईटवर या सूचना पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

One Nation, One Election
बेकायदेशीर शेल्टर होममधून 26 मुली बेपत्ता; ख्रिश्चन धर्माची दिली जात होती शिकवण!

सूचना कशासाठी मागवल्या?

'वन नेशन, वन इलेक्शन' व्यवस्था राबवण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळं सध्याच्या प्रशाकीय व्यवस्थेत बदल करुन वन नेशन वन इलेक्शन व्यवस्थेला पूरक असे बदल करण्यासाठी जे योग्य ते बदल करावे लागतील, ते काय असू शकतील याबाबत या सूचना असणार आहेत. (Latest Marathi News)

One Nation, One Election
CJI चंद्रचूड यांच्यासमोर सुरू होती सुनावणी अन् व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन पोहोचले ज्येष्ठ वकील... पुढे काय झालं?

या सूचना कुठे पाठवायच्या?

या सूचना कुठे आणि कधीपर्यंत पाठवायच्या याचा तपशीलही या समितीनं जाहीर केला. त्यानुसार, या समितीच्या वेबसाईटवर http://onoe.gov.in किंवा sc-hlc@gov.in. या ई-मेल आयडीवर या सूचना पाठवायच्या आहेत. यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाईन देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.