One Nation One Election: 'वन नेशन वन इलेक्शन'साठी होणार दहा हजार कोटींचा खर्च! निवडणूक आयोगाचं केंद्राला पत्र

One Nation One Election: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सरकारला पत्र लिहिले आहे.
One Nation One Election
One Nation One Election
Updated on

One Nation One Election:

देशात 'वन नेशन वन इलेक्शन' बाबत केंद्र सरकार उत्साही आहे. यात राजकारण देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान  नेतृत्वाखालील केंद्र सरकार यांच्या बाजूने असले तरी विरोधी पक्ष उघडपणे विरोध करत आहेत. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सरकारला पत्र लिहिले आहे.

लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) खरेदी करण्यासाठी दर 15 वर्षांनी अंदाजे 10,000 कोटी रुपये लागतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

आयोगाने सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ईव्हीएमच्या वापराचा कालावधी 15 वर्षांचा आहे आणि जर एकाच वेळी निवडणुका घेतल्या गेल्या तर या कालावधीत तीन वेळा निवडणुका घेण्यासाठी मशीनचा एक संच वापरला जाऊ शकतो.

One Nation One Election
Supreme Court: सुप्रीम कोर्टाला 22 जानेवारी सुट्टी नाही! ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

अंदाजानुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात एकूण 11.80 लाख मतदान केंद्रांची आवश्यकता असेल. जेव्हा लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात, तेव्हा प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएमचे दोन संच आवश्यक असतील - एक लोकसभा जागेसाठी आणि दुसरा विधानसभेच्या जागेसाठी. (Latest Marathi News)

One Nation One Election
Crime News: आधी चाकूने केले सपासप वार, नंतर दुचाकीला बांधलं अन् फरफटत...; नोएडातील हृदयद्रावक घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.