देशात आता 'वन नेशन, वन गोल्ड रेट'? लवकरच सुरु होणार 'बुलियन्स एक्स्चेंज'

देशात लवकरच सुरु होणार बुलियन्स एक्स्चेंज; देशभरात एकाच दरात मिळणार सोनं
gold price
gold pricegoogle
Updated on

नवी दिल्ली : स्टॉक्स एक्स्चेंजच्या धर्तीवर देशात आता बुलियन्स एक्सचेंजही सुरु होणार आहे. यामुळं देशभरात एकाच दरात सोनं मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याद्वारे 'वन नेशन वन गोल्ड रेट' हे धोरणं लागू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच गुजरातच्या गांधीनगरमधील 'गिफ्ट सीटी'त आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजचं उद्घाटन करण्यात आलं होतं. लवकरच याची सुरुवात होणार आहे. (One Nation One Gold Rate in India soon bullion exchange will begin)

gold price
लसीकरण मोहिमेनंतर CAAची अंमलबजावणी होणार; अमित शहांचे संकेत

देशात बुलियन्स एक्स्चेंज मार्केट सुरु झाल्यास सोनं खरेदी करणारे व्यापारी तसेच ग्राहकांना थेट या मार्केटमधूनच सोन खरेदी करता येईल. आत्तापर्यंत आयात केलेल्या सोन्यावर कमी-जास्त प्रमाणावर वाहतूक खर्च येत असल्यानं सोन्याचे दरही वेगवेगळे असायचे. पण आता आयात प्रक्रियेत पारदर्शकता येऊन सोन्याचे दरही कमी राहण्याची शक्यता आहे.

gold price
Ajit Pawar : अजित पवारांचा मुक्काम 'देवगिरी'तच; शिंदे सरकारकडून बंगल्याचं वाटप

सोन्याचे दर कमी होतील किंवा स्थिर राहतील यावर तज्ज्ञांना मात्र शंका आहे. याप्रकरणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पीएनजी सन्सचे सीईओ अमित मोडक म्हणाले, "आपला देश खूप मोठा आहे, त्यामुळं सोनं प्रत्यक्षात आयात झाल्यानंतर ते देशात ठराविक ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतूक खर्च, विमा खर्च तसेच होर्डिंग कॉस्ट वेगवेगळा येतो. यामुळं 'वन इंडिया वन गोल्ड रेट' धोरण प्रत्यक्षात येणं अवघड दिसतंय"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.