केंद्र सरकारने कांद्यावर 40% कर लावल्याने संपूर्ण देशामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.
तर दुसरीकडे आता सरकारने शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने हा विषय लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा केली जात आहे. शेतकऱ्यांना भावही मिळावा आणि नागरिकांना स्वस्तात कांदाही मिळावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत. मात्र कांद्याची भाववाढ ही कोणत्याही सरकारला परवडणारी नाही हीच वस्तुस्थिती आहे.
याचे कारण म्हणजे कांदा हे केवळ एक उत्पादन नसून भारतीय नागरिकांसाठी रोजच्या आहारामध्ये लागणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. यामुळे कांदा महागला कि कोणतही सरकार असो त्या सरकारचं टेन्शन वाढतचं.
मात्र एकेकाळी हाच कांदा महागला म्हणून देशाच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी या संपूर्ण देशात कांद्याची माळ घालून फिरल्या होत्या. हे तुम्हाला माहिती आहे का?
याबाबत अधिक माहिती अशी की, 1975 साली देशामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. त्या विरोधात जनता दलाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी 1977 साली झालेल्या निवडणुकीत देशातील नागरीकांनी सर्वप्रथम काँग्रेस सरकारला पाडलं होतं. इंदिरा गांधी 1977 साली पडल्या होत्या आणि काँग्रेसचे संपूर्ण देशामध्ये पानिपत झालं होतं.
त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे चौधरी चरण सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले. मात्र तीन आठवड्यात त्यांना देखील राजीनामा द्यावा.
इंदिरा गांधींच्या विरोधात निवडून आलेल सरकार हे येत्या दोन वर्षातच पडलं. १९८०साली देशात निवडणुकीची घोषणा झाली. 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसकडे म्हणजेच इंदिरा गांधी यांच्याकडे जनता पार्टी सरकारच्या विरोधामध्ये खूप मुद्दे होते.
मात्र इंदिरा गांधी यांच्या भाषणांमध्ये उल्लेख हा फक्त कांद्याचा आणि त्याच्या वाढलेल्या किमतींचा, असं म्हटलं जातं. म्हणूनच की काय या निवडणुकीला देशातला पहिला 'प्याज चुनाव' म्हणजेच 'ONION ELECTION' म्हटलं जात. त्यावेळी इंदिरा गांधी असे म्हणाल्या होत्या की, कांदा महागल्यामुळे गैर काँग्रेसचे सरकारच पतन या देशात झालं आहे
1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी पुन्हा देशाच्या पंतप्रधान कांद्याच्या वाढत्या किमतीमुळेच बनल्या. मात्र याच कांद्याने 1981 साली इंदिरा गांधी यांना देखील रडवलं होत. १ रुपयाला मिळणारा कांदा हा सहा रुपयाला मिळू लागला होता. त्यांच्या विरोधात देशात वर्षभरात लाट पाहायला मिळाली. मात्र त्यांनी याचा तोडगा काढला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.