Onion History: भल्याभल्यांना रडवणारा कांदा नेमका आला कुठून? 5 हजार वर्षांचा आहे इतिहास!

कांदा हा पाच हजार वर्षांपासून वापरात असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच कांद्याची उत्पत्ती जुनी आहे. (Where exactly did the onion come from)
Onion History
Onion History
Updated on

नवी दिल्ली- कांदा हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कांद्याच्या दरांमधील चढउतार आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकत असते. कांदा हा पाच हजार वर्षांपासून वापरात असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच कांद्याची उत्पत्ती जुनी आहे. कांदा सगळ्यात आधी कुठे निर्माण झाला. त्यानंतर तो जगभरात कसा पसरला याचा इतिहास रंजक आहे.

कांद्याचे उत्पादन जगभरातील देशांमध्ये घेतले जाते. भारत आणि चीनमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. असे असले तरी कांदा सर्वाधिक खाणाऱ्या देशांमध्ये भारत-चीनचा समावेश होत नाही. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली आहे. त्यामुळे कांदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Where exactly did the onion come from 5 thousand years of history ban revoke)

Onion History
Onion Export Ban Lift : कांदा निर्यातबंदी मागे पण याचा फायदा बड्या व्यापाऱ्यांनाच? विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

कोठून आला कांदा?

कांदा मध्य आशियामधून आला असं तज्ज्ञ सांगतात. सर्वात आधी कांदा इराण आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये घेतला गेला असं काही रिपोर्ट सांगतात. जंगली कांद्याचा सुरुवातीला शोध लागला. त्यानंतर हळूहळू त्याचा खाण्यात वापर वाढला. कांद्याची रितसर शेती सुरु झाली. काही तज्ज्ञांचा दावा आहे की कांदा पाच हजार वर्षांपेक्षा जुना आहे. सुरुवातीच्या काळात विविध जंगलामध्ये हे उगवत होते.

अन्नाला चव देण्यामध्ये कांदा महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच कांद्याची निर्यात-आयात मोठ्या प्रमाणात होत असते. चरक संहितेमध्ये कांद्याचे विविध फायदे सांगण्यात आले आहेत. काही आजारांमध्ये औषध म्हणून देखील कांद्याचा वापर होतो. कांद्याला खूप काळ साठवून ठेवलं तरी तो खराब होत नाही हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ठ्य आहे.

इजिप्तमध्ये देवाच्या प्रार्थनेचे प्रतीक

इजिप्तमध्ये कांद्याला खूप महत्व आहे. याला देवाच्या प्रार्थनेचे प्रतीक मानलं जातं. इजिप्तच्या लोकांची धारणा आहे की कांदा आणि माणसाचे आयुष्य यांमध्ये साधर्म्य आहे. ज्या प्रमाणे कांद्याचा एक-एक स्तर निघतो, तसंच माणसाचं जीवन आहे. त्यामुळे इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याला पुरताना त्याच्यासोबत कांदा ठेवला जातो. जुन्या काळापासून असं होत आलं आहे. कांद्याला अंत्यसंस्कारात देण्यात येणाऱ्या भेटीच्या स्वरुपात पाहिलं जातं.

Onion History
Nashik Onion Crop: यंदा उन्हाळी कांदा जोमात! अनुकूल वातावरणामुळे बहरले पीक, उत्पन्न वाढीची शक्यता

जगभरात उत्पादन

संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, १७५ देशांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गहुचे उत्पादन घेणाऱ्या देशांपेक्षा कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या देशांची संख्या दुप्पट आहे. कांद्याला वैश्विक पदार्थ देखील म्हटलं जातं. भारत, चीन, अमेरिका, इजिप्त, तुर्की आणि पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होते. तजाकिस्तानमध्ये सर्वाधित कांद्याचा वापर होतो. प्रति व्यक्ती ६० किलो कांदा वापर या देशात होतो. त्यानंतर नायजेरिया आणि सूडान या देशांचा क्रमांक लागतो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.