नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. यामुळं शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारनं कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेलं किमान निर्यात मूल्य (Minimum Export Price - MEP) काढून टाकलं आहे. यामुळं या शेतकऱ्यांना आता थेट परदेशात आपला शेतमाल निर्यात करता येणार आहे.