Onion Price: कांद्याच्या दर नियंत्रणासाठी सरकारचं मोठ पाऊल! निर्यातमुल्यात केली दुप्पट वाढ

एका अर्थानं सरकारनं कांदा निर्यातीवर अघोषित बंदीच आणली आहे.
Big decision of the central government Onion prices will come under control
Big decision of the central government Onion prices will come under control
Updated on

लासलगाव : सणासुदीचा काळ तसेच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात घट झाल्यानं कांदा चांगलाच महागला आहे. सध्या कांद्याच्या किरकोळ विक्रीचा दर देशभरात ६० ते ८० रुपये किलोवर पोहोचला आहे.

तसेच येत्या काळात तो १०० रुपयांवर जाण्याचा अंदाजली वर्तवला जात आहे. त्यामुळं दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलत कांद्याच्या निर्यातमुल्यात दुप्पट वाढ केली असून ती ८०० डॉलर प्रति टन (३१ डिसेंबरपर्यंत) इतकी केली आहे. (Onion Price govt big step to reduce onion price Export value doubled to 800 dollar per ton)

Big decision of the central government Onion prices will come under control
Sharad Pawar: शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस; काय आहे प्रकरण जाणून घ्या

बाजार समित्यांत दरात वाढ

देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या बारा दिवसांमध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात ६० टक्के वाढ झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी २८७० रुपये मिळणारे बाजार भाव ५८६० रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे होत नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा २५ रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याच्या निर्णय घेतला. (Latest Marathi News)

याला २४ तास उलटत नाही तोच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढत कांद्याच्या निर्यात शुल्क दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ४०० डॉलर वरून ८०० डॉलर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

Big decision of the central government Onion prices will come under control
Uddhav Thackeray: ठाकरेंनी घेतली पवारांची बाजू! शेतकऱ्यांसाठी काय केलं? विचारणाऱ्या मोदींनाच केला प्रतिप्रश्न

उत्पादकांच्या निर्णयाकडे लक्ष

या अगोदर केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात शुल्क वाढ करत ४० टक्के केले. बाजार समित्या बंद ठेवून कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला होता. आता कांदा निर्यात मूल्य दरामध्ये ८०० डॉलर प्रति टन केल्याने कांदा उत्पादक या निर्णयाविरुद्ध काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागून आहे. (Marathi Tajya Batmya)

Big decision of the central government Onion prices will come under control
Sawai Gandharv Mahotsav: 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तारीख जाहीर; कधी अन् कुठे होणार?

सरकारला इशारा

कांद्यावर ८०० डॉलर किमान निर्यात मूल्य म्हणजे सरकारने अघोषित निर्यात बंदीच केली आहे. वर्षभर शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत दर मिळत नाही, तेव्हा हेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना कवडीचीही मदत करत नाही.

परंतु कधीतरी कांदा दरवाढ होण्यास सुरवात झाली की पूर्ण ताकतीनिशी कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जातात. सरकारचे कांदा धोरण पूर्णपणे शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांमध्ये सरकार प्रति प्रचंड संतापाची भावना आहे.

आता कांद्या दरात घसरण झाल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे.

Big decision of the central government Onion prices will come under control
Ved, Sanskrit in Madarsha: मदरशांमध्ये वेद अन् संस्कृत शिकवणार! उत्तराखंडच्या मदरशा बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

फेरविचार व्हावा

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्याबाबत धर सोडीचे निर्णय घेत असल्याने कांद्याची जागतिक बाजारपेठ गमविण्याची निर्यातदारांवर आली आहे. तसेच परकीय चलन सुद्धा देशाचे बुडणार आहे. या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसणार असल्याने केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कांदा निर्यात धार व्यापारी करत आहे, असं निर्यातदार प्रविण कदम यांनी म्हटलंय.

Big decision of the central government Onion prices will come under control
Gujrat Family Suicide: धक्कादायक! सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या; 3 मुलांचाही समावेश

निर्यातीवर अघोषित बंदीच

केंद्र सरकारची ही अघोषित निर्यात बंदीच म्हणावे लागेल. नाफेडच्या मार्फत कमी भावात कांदा खरेदी करत शेतकऱ्यांची लूट केली. चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. उर्वरित कांद्याला दोन पैसे मिळतील, या आशाने शेतकऱ्यांनी कांदा ठेवला होता.

मात्र सरकारच्या अडमुठे धोरणामुळे निराशा झाली. शेती साधनसामग्रीत मोठ्या प्रमाणात किमती वाढल्या याच्यावर लक्ष नाही. मात्र कांद्याचे भाव वाढले तर सरकारच्या पोटात गोळा उठतो, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक निवृत्ती न्याहारकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.