श्रीनगर : आम आदमी पक्ष (आप) हा 'केवळ केंद्रशासित प्रदेश दिल्लीचा पक्ष आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ काँग्रेसच भारतीय जनता पक्षाला (भाजप) आव्हान देऊ शकते, असे मत काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी व्यक्त केले. (Ghulam Nabi Azad news in Marathi)
काँग्रेस पक्षाबरोबरच्या अनेक दशके काम करून बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच आझाद यांनी म्हटलं होतं की, ते धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात नसून कमकुवत पक्षव्यवस्थेच्या विरोधात आहेत.
श्रीनगर येथे एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, "मी काँग्रेसपासून विभक्त झालो असलो तरी मी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात नव्हतो. केवळ पक्षाची व्यवस्था कमकुवत झाल्यामुळेच मी बाहेर पडलो. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी करावी अशी माझी अजूनही इच्छा आहे. तर भाजपला आव्हान देण्यासाठी 'आप' सक्षम नाही, असंही ते म्हणाले.
काँग्रेसवर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, पक्षाने हिंदू, मुस्लिम आणि शेतकऱ्यांनी अनेक वर्षे काम केलं. आम आदमी पार्टी या राज्यांमध्ये काहीही करू शकत नाही, पंजाबमध्ये ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पंजाबची जनता त्यांना पुन्हा मतदान करणार नाही, असंही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.