नवी दिल्ली : भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे (India Petrol-Diesel Prices) दर वाढलेले आहेत. पण नागरिकांना या वाढलेल्या दरापासून दिलासा मिळणार, की आणखी इंधनाच्या किंमती वाढणार याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. जगभरात जगभरातील तेल उत्पादक राष्ट्रांचा समूह असलेल्या OPEC+ ची मंगळवारी (Opec+ Meeting) एक महत्त्वाची बैठक आहे. यामध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन (Crude Oil Production) वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
कच्च्या तेलाच्या मागणीवर कोरोनाचा प्रभाव नाही -
कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 4 लाख डॉलर बॅरलने उत्पादन वाढवण्यासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पण, कोरोना परिस्थितीचा कच्च्या तेलाच्या मागणीवर फारसा प्रभाव पडणार नाही. तसेच मागणीत घट होण्याची शक्यता देखील फारच कमी आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी OPEC+ फेब्रुवारी 2022 पासून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
लॉकडाऊन काळात उत्पादन कमी -
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. यावेळी कच्च्या तेलाच्या मागणी तीव्र घट झाली होती. त्यामुळे OPEC+ ने १० दशलक्ष बॅरलने उत्पादन कमी केले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून ते पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. आतापर्यंत 5.8 दशलक्ष बॅरल उत्पादनात कपात करण्यात आली आहे. आता फेब्रुवारीपासून 4 लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवले जाऊ शकते. त्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
...तर भारताला मोठा दिलासा
कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायचे ठरवले तर त्याचा सर्वाधिक फायदा भारताला होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळले. कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्याने किंमती खाली येतील, त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकेल. अमेरिका आणि भारतासह अनेक देश ओपेक प्लस देशांकडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची मागणी करत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळ आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.