अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
बंगळूर : सिंगापूरमध्ये (Singapore) राज्य सरकार (Congress Government) पाडण्याचा कट रचला जात आहे, तशी माहिती मिळाली असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी येथे सांगितले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘काहीजण बंगळूरमध्ये राजकारण करण्याचे सोडून सिंगापूरला जात आहेत. या सगळ्याची आम्हाला जाणीव आहे. त्याचे डावपेच काय आहेत, हे मला माहीत आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी अनेक कटकारस्थाने सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या असंतुष्ट वर्तुळात चिंता वाढली आहे.
अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यासोबतच भाजप आणि संघ परिवारातील काही नेते काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.’’ १३५ आमदारांच्या जोरावर स्थापन झालेले स्पष्ट बहुमताचे सरकार पाडणे अशक्य आहे, असा विश्वास असतानाही काही हालचाली संशय निर्माण करत आहेत.
निवडणूक निकाल जाहीर झाला, तेव्हा धजद नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (Kumaraswamy) त्यांच्या नातेवाईकांसोबत सिंगापूरमध्ये आराम करत होते. राजकीय गणिते उलटली आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतरच्या घडामोडींमध्ये धजद आणि भाजपने हातमिळवणी केली आहे.
काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार लढाई सुरू आहे. बंगळूर येथील ‘इंडिया समीट’मध्ये सहभागी झालेल्या राजकीय नेत्यांना घेऊन जाण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविरोधात धजद आणि भाजपने सभागृहात आणि बाहेर निदर्शने केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू झाली. त्यानुसार धजद बैठकीपासून दूर राहिला. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीतही धजद दिसला नाही.
धजदच्या आमदार आणि नेत्यांनी बंगळूरमध्ये बैठक घेतली. त्यात धजद पक्ष भाजप आणि काँग्रेसपासून अंतर ठेवेल, असे स्पष्ट करून समांतर शक्ती म्हणून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतरही पडद्यामागच्या राजकीय हालचालींना उधाण आले आहे. ‘ऑपरेशन कमळ’ला पूरक अशी चर्चा सुरू असल्याच्या अफवा आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही त्याला दुजोरा दिला असून परदेशात सरकार पाडण्याचे षड्यंत्र असल्याचे सांगितले आहे.
महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा म्हणाले की, भाजप लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हीही सावधगिरी बाळगली पाहिजे. आमच्या आमदारांवर विश्वास आहे. तथापि, सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपने अनेक सरकारे पाडल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असावे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.